फुटबॉल खेळाडूंची हेअर स्टाइल तरुणांनी उतरवली डोक्‍यावर

FIFA FEVAR hair styale news
FIFA FEVAR hair styale news

पिंपरी : फुटबॉल वर्ल्ड कपचा फिव्हर दिवसेंदिवस वाढत आहे. स्पेनचा आइसको, जर्मनीचा टोनी क्रूस, ब्राझीलचा नेमार, अर्जेंटिनाचा लिओनल मेस्सी आणि पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो या आघाडीच्या खेळाडूंची सध्या फुटबॉल विश्‍वात बरीच हवा आहे. आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचे लक्ष वेधणारे हे खेळाडू आपल्या हटके हेअर स्टाईलमुळे चर्चेत आहेत. या फुटबॉल खेळाडूंची हेअर स्टाइल अनेक तरुणांनी आपल्या डोक्‍यावर उतरवली आहे. 


हेअर स्टाईल्स हा मुलींचा विषय. हा समजच आता तरुण मुलांनी मोडीत काढला आहे. अनेक भन्नाट आणि बिंधास हेअरस्टाईल्स करत, केस रंगवत तरुण मुले स्वत:लाच एक स्मार्ट लुक देताहेत. अलीकडे तरुण मुलांच्या जगात नवनव्या हेअरस्टाईलने अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. केजीपासून ते कॉलेजर्पयतच्या सर्वच मुलांची हेअर स्टाइल बदललेली दिसत आहे. विशेष म्हणजे, अनेकांचे पालकसुद्धा या बदलत्या हेअर स्टाईल्सकडे कौतुकाने पाहत आहेत. 

यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेमध्ये खेळाडूंनी ठेवलेल्या हेअर स्टाईलचा ट्रेंडही तितकाच चर्चेचा ठरत असून खेळाडूंची ही हेअर स्टाईल अनेक तरुणांनी डोक्‍यावर उतरली. यात 18 ते 25 वयोगटातील ग्राहक मोठया प्रमाणात आहे. 

थ्रीडी हेअर कट.. 
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या काळात थ्रीडी हेअर कट विथ टॅटू प्रचलित आहे. या ठेवणीमध्ये मागील बाजूने केस बारीक करून त्यावर "फिफा' नाव कोरून घेण्याचे फॅड वाढले आहे. या केशरचनेला आणखी उठाव देण्यासाठी रंगांचाही वापर करता येतो. महत्त्वाची फुटबॉल अथवा क्रिकेट स्पर्धेच्या मोसमात अशी "हेअर स्टाइल' करण्याकडे तरुणाईचा भर असतो. 

"सध्या नव्या-नव्या ट्रेंडनुसार हेअरस्टाईल बदलताना दिसून येत आहे. ही मुले गुगलवरून फोटो आणून दाखवतात. त्याप्रमाणे अत्याधुनिक प्रकारच्या मशिनरी वापरून तरुण आपल्या डोक्‍यावर खेळांडूची हेअर स्टाईल करवून घेतात. असे हेअर स्टायलीस्ट मंगेश राऊत यांनी स्पष्ट केेले.

"मी रोनाल्डोचा मोठा फॅन आहे. त्यामुळे त्याने ठेवलेल्या हेअर स्टाईलची मी कॉपी केली आहे. आमच्या मित्राच्या ग्रुपनेदेखील वेगवेगळ्या खेळांडूंची हेअर स्टाईल केली आहे.  कॉलेज युवक अनिकेत पवार याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com