पाचवी आणि आठवीच्या परिक्षेचा निकाल जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पाचवी आणि आठवीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा सरासरी निकाल केवळ 18 टक्के लागला आहे. फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा झाली होती. एकूण पात्र एक लाख 54 हजार 622 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. राज्य परीक्षा परिषेदेने आज दुपारी 3 वाजता हा निकाल जाहीर केला.

पुणे: पाचवी आणि आठवीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा सरासरी निकाल केवळ 18 टक्के लागला आहे. फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा झाली होती. एकूण पात्र एक लाख 54 हजार 622 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. राज्य परीक्षा परिषेदेने आज दुपारी 3 वाजता हा निकाल जाहीर केला.

पाचवीसाठी 4 लाख 72 हजार 884 जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 09 हजाक 225 विद्यार्थी पात्र ठरले. यातील 16 हजार 693 जणांना शिष्यवृत्ती मिळेल. आठवीच्या 3 लाख 98 हजार 902 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील पात्र विद्यार्थ्यांची संख्या फक्त 45 हजार 397 आहे. यापैकी 16 हजार 588 जणांना शिष्यवृत्ती मिळेल.

आठवीचा निकाल केवळ 12 टक्के आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची कठीण्य पातळी उच्च होती. त्यातील 20 टक्के प्रश्नाच्या उत्तरांचे दोन पर्याय बरोबर होते. त्या दोन्ही पर्यायांसमोरील वर्तुळे शाईने भरायची होती. त्यामुळे प्रश्नांचे काठीण्य वाढले. त्यामुळे आठवीचे कमी विद्यार्थी पात्र ठरले, असे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Fifth and eighth Scholarship examination results declared

टॅग्स