नेपाळच्या सीमेवर अडकले ५८ पर्यटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

पुणे - पुणे शहर आणि नेपाळमधील पर्यटन कंपन्यांमधील वादातील पुणे, मुंबई, सांगली, बेळगाव, धुळ्यातील ५८ पर्यटक नेपाळच्या सीमेवर गेल्या तीन दिवसांपासून अडकले आहेत. दरम्यान, या पर्यटकांची कैलास मान सरोवराची यात्रा मंगळवारी मार्गी लागेल, असा दावा पर्यटन कंपनीने केला आहे.

पुणे-मुंबईसह राज्याच्या भागातील ५८ पर्यटक कैलास मान सरोवर यात्रेला २२ मे रोजी रवाना झाले आहेत. हे पर्यटक नेपाळमधील काठमांडूपासून २०० किलोमीटर अंतरावर तैमूर या गावात आहेत. तेथून दीड किलोमीटरवर चीनची सीमा आहे. रघुकुल ट्रॅव्हल्स आणि नेपाळमधील पर्यटन कंपनीमध्ये ५४ लाख रुपयांच्या थकबाकीवरून वाद झाल्याने पर्यटकांना पुढे नेण्यास नेपाळच्या कंपनीने नकार दिला. तेथेही त्यांना एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये हलविण्यात आले. त्यामुळे पर्यटकांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू; तसेच नेपाळमधील भारतीय दूतावासातही संपर्क साधला. काहींनी मदतीसाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशीही संपर्क साधला. यात्रा अनिश्‍चित होत असल्याने काही पर्यटकांनी ‘सकाळ’शी संपर्क साधला. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने रघुकुल ट्रॅव्हल्सशी संपर्क साधल्यावर ‘संबंधित कंपनीबरोबरील वाद मिटले आहेत, पर्यटकांची यात्रा मंगळवारी मार्गी लागेल,’ असे सांगण्यात आले.

Web Title: fifty-eight tourists stuck on Nepal border