पुण्याचे डिंभे धरण भरले ५० टक्के

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

आंबेगाव तालुक्यात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रातील भीमाशंकर -आहुपे खोऱ्यात संततधार पाऊस सुरु आहे. शनिवारी (ता. 27) दुपारी एक वाजेपर्यंत 49 टक्के धरण भरले आहे.

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात डिंभे धरण पाणलोट क्षेत्रातील भीमाशंकर -आहुपे खोऱ्यात संततधार पाऊस सुरु आहे. शनिवारी (ता. 27) दुपारी एक वाजेपर्यंत 49 टक्के धरण भरले आहे.

आज सकाळी आठ वाजता धरण 46.36 टक्के भरले होते. गोहे खोऱ्यातील पाझर तलावातील पाणी सांडव्या वरून वाहत आहे. त्यामुळे घोडनदीला पूर आला आहे. पावसामुळे शेतातील कामे व तरकारी व भाजीपाला तोडणीची कामे बंद आहेत. 

बुधवार (ता.24) पासून पाऊस सुरु झाला असून शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 766 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी धरणातील पाणी पातळी 715. 450 मीटर होती. सध्या 706.70 मीटर पाण्याची पातळी आहे. घोडेगाव, मंचर, अवसरी खुर्द, रांजणी, कळंब व सातगाव पठार भागातील ओढ्यानाल्यांना पुर
आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifty percent water in dimbhe dam