छप्पन्न टक्के लोकांना हवे आणखी समुपदेशन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

‘सकाळसोबत बोलूया’ या हेल्पलाइनवर गेल्या तीन महिन्यांत राज्यभरातून सुमारे चार हजारांहून अधिक लोकांनी विविध मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी मुक्त संवाद साधला. तज्ज्ञ समुपदेशक, मानसिक विकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांनी फोन करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार देत त्यांचे योग्य समुपदेशन व मार्गदर्शन केले.

गेल्या तीन महिन्यांत चार हजारांहून अधिक जणांनी साधला मुक्त संवाद
पुणे - ‘सकाळसोबत बोलूया’ या हेल्पलाइनवर गेल्या तीन महिन्यांत राज्यभरातून सुमारे चार हजारांहून अधिक लोकांनी विविध मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी मुक्त संवाद साधला. तज्ज्ञ समुपदेशक, मानसिक विकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांनी फोन करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार देत त्यांचे योग्य समुपदेशन व मार्गदर्शन केले. या हेल्पलाइनमुळे लोकांना व्यक्त होण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ‘सकाळसोबत बोलूया’ ही हेल्पलाइन मानसिक ताण-तणाव व समस्येचा सामना करणाऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने we are in this together या मोहिमेअंतर्गत व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने आणि कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसअँबीलीटीजच्या सहकार्याने मानसिक ताण - तणाव व्यवस्थापन व एकूणच मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ ही चोवीस तास मोफत हेल्पलाइन तीन ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली. त्याला आज तीन महिने पूर्ण झाले.

Image may contain: text that says "असे करा बुकिंग खाली दिलेला QR कोड स्कॅन करून किंवा खालील लिंक ओपन करून आपली व्यक्तिगत माहिती मरून आपल्याला ज्या समुपदेशकांचे मार्गदर्शन हवे आहे त्या समुपदेशकांचा पर्याय निवडून आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडून अपॉइटमेंट बुक करू शकता. अपॉइटमेंट बुक केल्याबरोबर आपल्याला ई-मेल अपॉइटमेंटसंवंधी माहिती मिळेल. https://www.wait.in/therapy/ अधिक माहितीसाठी संपर्क ९९६०५००१४३ We are in this together या मोहिमेच्या शेजारील इन्स्टाग्राम व फेसबुक पेजला भेट देऊ शकता. आपणही हेल्पलाइनवर फोन करून बोलू शकता. चला तर मग, 'सकाळसोबत बोलूया' ०२०-७११७१६६९ या क्रमांकावर फोन करून आमच्याशी बोला. आपली व्यक्तिगत माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. f हेल्पलाइनसाठी www.waitt.in या वेबसाइटला भेट द्या!"

राज्यभरातून हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांमध्ये ५६ टक्के लोकांना एकाहून अधिक वेळा समुपदेशनाची गरज आहे असे निदर्शनास आले. तसेच ३५ टक्के लोकांना विशिष्ट मानसिक उपचारांची आवश्‍यकता आहे व २१ टक्के लोकांना विशिष्ट तपासण्यांची गरज आहे आणि २६ टक्के लोकांना मानसिक स्वास्थ्याविषयी विशिष्ट औषधांची गरज आहे असे दिसून आले. हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांमध्ये पुरुष वर्गाचे प्रमाण ६३. ८ टक्के होते तर महिला वर्गाचे प्रमाण ३५ टक्के  होते. 

गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणात संशयितांवर आरोप निश्‍चिती

हेल्पलाइनवर मदतीसाठी फोन करणाऱ्या चार हजार लोकांमध्ये खासगी नोकरदार वर्गाचे प्रमाण पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल गृहिणींचे प्रमाण दुसऱ्या क्रमांकावर आहे. सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिक तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच व्यावसायिक, विद्यार्थी, बेरोजगार व्यक्ती व शेतकरी या वर्गांचे प्रमाण लक्षणीय आहे. येणाऱ्या कॉल्सच्या समस्यांमध्ये चिंता, काळजी, भीती आणि मानसिक विकार यामुळे येणारा मानसिक ताण - तणाव संबंधित प्रश्नांचा प्रामुख्याने समावेश होता. पुनीत बालन ग्रुपचे संचालक पुनीत बालन हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. हेल्पलाइनच्या सॉफ्टवेअरसाठी टेक्‍नोस्मार्टचे मंदार जोशी यांचे सहकार्य मिळाले. 

पुढच्या वर्षीपासून मराठीमध्ये 'लाॅ'

ऑनलाइन अपॉइंटमेंटची सुविधा
चिंता, काळजी, एकटेपणा मुळे येणारा मानसिक ताण तसेच नैराश्‍य व घरगुती हिंसाचार, यामुळे उद्भवणाऱ्या मानसिक समस्या, यावर सर्व वयोगटातील नागरिकांना नाममात्र सशुल्क दरात तज्ज्ञ समुपदेशकांचे मार्गदर्शन घेता येईल. त्यासाठी we are in this together या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्या सोयीनुसार, वेळेनुसार व आपल्या समस्येनुसार तज्ज्ञ समुपदेशकांची अपॉइंटमेंट तुम्हाला बुक करता येईल. प्राथमिक टप्प्यात नैराश्‍य व घरगुती हिंसाचार, यामुळे येणाऱ्या मानसिक ताण-तणाव व समस्यांच्या समुपदेशनासाठी ही सुविधा असेल. समुपदेशन घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिगत माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty six percent people want more counseling