esakal | पुण्यातील रस्त्यांची कामे...अधिकारी...अन् अजित पवार...
sakal

बोलून बातमी शोधा

pawar.jpg

कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करावयाची आहेत. भूसंपादनाची कामे प्रलंबित राहू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुण्यातील रस्त्यांची कामे...अधिकारी...अन् अजित पवार...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करावयाची आहेत. भूसंपादनाची कामे प्रलंबित राहू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग आणि पालखी मार्ग संदर्भातील भूसंपादन आणि सोलापूर-कोल्हापूर रस्ते महामार्गावरील मिरज बाह्यवळण रस्त्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम लवकर व्हावे. भूसंपादनातील त्रुटी दूर करा, उपलब्ध निधी वेळेत खर्च करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

सातारा जिल्ह्यातील कराड-तासगाव रस्ता आणि पुलाचे काम लवकर करावे. सातारा- कोरेगांव- म्हसवड हा रस्ता महत्त्वाचा आहे. खंबाटकी घाटातील बोगद्याचेही काम त्वरित पूर्ण करावे. सोलापूर शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. टेंभुर्णी-पंढरपूर- मंगळवेढा- उमदी- विजापूर आणि अक्कलकोट-नळदुर्ग- तुळजापूर रस्त्यांच्या कामाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. 

शिरूर शहरावर कोरोनाच्या धोक्याची टांगती तलवार

चाकण, राजगुरुनगर, वाघोलीतील कोंडी सोडवा : पुणे जिल्ह्यातील नाशिक रोडवरील चाकण, राजगुरुनगर येथे वाहतूक कोंडी होते. तसेच वाघोली येथेही तिच परिस्थिती उद्भवते. तेव्हा तेथील रुंदीकरणाचे काम करावे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. पुणे ते शिक्रापूर रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. चारही बायपासचे काम सुरू असले तरी ते पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. चांदणी चौकातील रस्त्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top