Tanaji Sawant
Tanaji Sawantsakal

'मराठा' आरक्षणासाठी लढा देणार ; आमदार सावंत

मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊरत्न पुरस्कार प्रदान

पुणे : मराठा सेवा संघाचे कार्य (maratha seva sangh)हे कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून, केवळ खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचे आहे. विखुरलेला मराठा समाज एकत्र (Maratha community)करण्याचे कार्य जिजाऊंच्या विचारांनी झाले, त्याच विचाराने सर्व मराठा संघटनांना एकत्रित करून मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation)लढा दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant)यांनी केले.

Tanaji Sawant
ओमिक्रॉनचा भारतात एक बळी,जगात किती? आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट

मराठा सेवा संघ पुणे शहराच्या वतीने ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते १२ जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीपर्यंत दशरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ यांच्या जयंतीदिनी मराठा सेवा संघाच्या वतीने लाल महाल येथे आयोजित कार्यक्रमात तंजावर तमिळनाडू येथील व्यंकोजीराजे यांचे वंशज विजयराजे भोसले यांच्या हस्ते जिजाऊरत्न सन्मान आणि जिजाऊ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी आमदार सावंत बोलत होते.(Maratha reservation News update)

Tanaji Sawant
कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार सावंत यांना जिजाऊरत्न पुरस्कार तर, योगाचार्य सुमन कुसळे यांना जिजाऊ स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी भोसले यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याचे कौतुक केले. मराठा सेवा संघाचे विचार समाजाला आणि लोकशाहीला मार्गदर्शक असतील, असे त्यांनी नमूद केले.मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सचिन आडेकर आणि मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुंजीर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नगरसेवक योगेश समेळ, एकता योगा ट्रस्टचे नाना निवंगुणे, नीता रजपूत, सीमा महाडीक , हर्षवर्धन मगदूम, राजेंद्र बलकवडे, मारुती सातपुते, अनुसया गायकवाड, वंदना इंदापूरकर, आरती घुले, नंदा कवळे, प्रफुल्लता वडके, स्वाती अंदुरे, डॉ. चंद्रकांत कुंजीर, अण्णा तळेकर, शिवाजीराव कुसळे, राकेश भिलारे, साईनाथ भांडगे, राकेश नामेकर, गुरू कट्टी, कैलास अवताडे आदी या वेळी उपस्थित होते.(Pune News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com