पुणे : हल्लाबोलचे होर्डिंग उतरविल्याने वादावादी

मिलिंद संधान 
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे होर्डींग काढणाच्या प्रयत्न नगरसेवक नाना काटे व त्यांच्या समर्थकांनी आज हाणून पाडला.

नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे होर्डींग काढणाच्या प्रयत्न नगरसेवक नाना काटे व त्यांच्या समर्थकांनी आज हाणून पाडला.

पिंपळे सौदागर जगताप डेअरी मध्यावरील साई चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोसरी व काळेवाडी येथे मोदी व फडणवीस सरकारच्या कामगिरी निषेधार्थ हल्लाबोल कार्यक्रमासंबंधीचे होर्डींग लावण्यात आले आहे. महापालिकेने ते अनाधिकृत ठरवून क्रेनच्या सहायाने काढावयास सुरूवात केली असता ही गोष्ट स्थानिक नगरसेवक नाना यांच्या कानावर आली. त्यांनी लागलीच अधिकाऱ्यांना फोन करून अधिकृत होर्डींगवर कारवाई न करण्याची मागणी केली. परंतु तरीही कारवाई सुरूच राहिल्याने ते आपल्या समर्थकांसह तेथे पोहचले. शेवटी प्रशासणाला नगरसेवक नाना यांच्यासमोर नमते घ्यावे लागले. आणि अर्धवट काढलेले होर्डिंग पुन्हा पुर्ववत करावे लागले. 

नगरसेवक नाना काटे म्हणाले, "राज्यभर राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या विरूध्द हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून रान पेटविले आहे. त्याचा दिवसेंदिवस भडका वाढतच चालल्याने राज्य सरकारचे काऊन डाऊन सुरू झाले असून त्यांच्या पायाखालीची वाळु घसरू लागली आहे. त्यामुळे ते आता अधिकाऱ्यांवर दबाब तंत्राचा वापर करून सुडाचे राजकारण करीत आहे. परंतु म्हतारीने कोंबडा खुराड्याखाली झाकला तरी पहाट होणारच आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे." याबाबत महापालिका प्रशासणाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

बुधवारी (ता. 11) राष्ट्रवादीचा हल्लाबोल काळेवाडी येथे सायंकाळी सहा वाजता सभा घेण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत हल्लाबोल सभा होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहरात हल्लाबोलचे फ्लेक्स लावले होते.

Web Title: fight for hallabol poster removed