लोणी काळभोर येथे किरकोळ कारणावरून मारहाण, तीघेजण जखमी

crime
crime

लोणी काळभोर (पुणे) : येथील पाषाणकरबाग चौकात किरकोळ कारणावरुन आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने कोयता, चाकु, लोखंडी रॉड या सारख्या तीष्ण हत्याऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात कदमवाकवस्ती (तदा. हवेली) येथील तीन तरुण जखमी झाले. जखमी झालेल्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असुन, ही घटना शनिवारी (ता. 14) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

वरील घटनेत अभिजीत उर्फ पप्पु रामदास बडदे (वय- 28), राज वलटे व सलमान पठाण हे तीन जण जखमी झाले आहेत. राज वलटे हा गमभीर जखमी असुन, अभिजीत बडदे याने दिलेल्या तक्रारूनुसार, लोणी काळभोर काळभोर पोलीसांनी युवराज माणिक अंबुरे, फिरोज महंमंद शेख, इमरान महमंद शेख, इरफान महमंद शेख,अमन मौलोद्दिन शेख, राहुल वंसत उघाडे, समिर उर्फ मुन्ना सय्यद व गिड्ड्या उर्फ अल्ताफ मौलोद्दिन शेख (रा. वरील सर्वजण पठारे वस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली) या आठ जनांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. युवराज अंबुरे व फिरोज शेख हे दोघेही जण अट्टल गुन्हेगार असुन, दोघांच्यावरही यापुर्वी अनुक्रमे हडपसर व लोणी काळभोर पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत बडदे याचा मित्र सलमान पठाण व त्यांचे कांही सहकारी शनिवारी सकाळी दहा वाजनेच्या सुमारास इराणीवस्ती जवळील मोकळ्या जागेत गप्पा मारत असताना, युवराज अंबुरे, फिरोज शेख व त्याच्या वरील साथिदारांनी सलमान पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ व हाताने मारहान केली. ही बाब अभिजीत बडदे याला समजताच, बडदे व सलमान पठाण यांनी युवराज आंबुरे व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहानीची तक्रार पोलिसात दिली. तक्रार दाखल करुन, बारा वाजनेच्या सुमारास बडदे व सलमान पठाण घराकडे जात होते. त्याचवेळी चार ते पाच मोटार सायकलवरुन आलेल्या युवराज अंबुरे, फिरोज शेख व त्याच्या वरील साथिदारांनी बडदे व सलमान पठाण यास कोयता, लोखंडी रॉड, स्टंम्प, धारदार चाकुनी मारहान करण्यास सुरुवात केली. या भांडणे सोडविण्यासाठी मधे पडलेल्या राज वलटे याच्यावरही आंबुरे याने हल्ला चढवला. या हल्ल्यात राज वलटेच्या डोक्यात कोयत्याचा वार बसल्याने, राज वलटे हा गंभीर जखमी झाला. दरम्यान शनिवारी लोणी काळभोरचा आठवडे बाजार असल्याने, पाषानकरबाग चौकात मोठ्या प्रमानात गर्दी होती. आंबरे व त्याच्या सहकाऱ्यांच्या हातातील धारदार शस्त्रे पाहुन रस्त्यावरुन येजा करणाऱ्यांत एकच धावपळ ऊडाली. या धावपळीत बडदे व सलमान दोघेही पळाल्याने, आंबुरे याच्या तावडीतुन  वाचले. ही बा3ब पोलिसांना समजताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिस पोहचण्यापुर्वीच हल्लेखोर पसार झाले होते. 

युवराज आंबुरे व त्याच्या टोळीवर खऱेच कारवाई होणार का?

युवराज अंबुरे व फिरोज शेख हे दोघेही अट्टल गुन्हेगार असुन, मागिल चार ते पाच वर्षापासुन कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत धुडगुस घालत आहेत. लोणी काळभोर व हडपसर पोलिस ठाण्यात हद्दीत दोघांच्यावरही प्रत्येकी एका खुनाचा प्रयत्न सारख्य़ा गंभीर गुन्ह्यासह अनेक किरकोळ गुन्हे दाखल आहेत. अंबुरे याने सात ते आठ जनांची टोळी बनवली असुन, या टोळीच्या माध्यमातुन कदमवाकवस्ती हद्दीत अनेकांना मारहान करणे, शिवीगाळ करणे महीलांची छेड काढणे ही बाब नित्याचीच बनली आहे. दोन वर्षापुर्वी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीजवळ उरुळी कांचन येथील एका नामचीण गुंडांचा खुन झाला. या खुनातील आरोपींच्याबरोबर अंबुरे उठणे बसणे असल्याने, अंबुरे विरोधात गुन्हे दाखल करण्यास लोक धजावत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. यावेळस तरी लोणी काळभोर अंबुरे व त्याच्या साथिदारांना कारवाईचा बडगा दाखवणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

मोक्का अंतर्गत कारवाईसाठी प्रयत्न करणार- सुहास गरुड

दरम्यान याबाबत प्रतिक्रिया देताना हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड म्हणाले, युवराज अंबुरे व फिरोज शेख हे दोघेही अट्टल गुन्हेगार असुन, त्यांच्यावर हडपसर व लोणी काळभोर पोलिसांत दाखल असलेल्या गुन्हाची माहिती संकलीत करण्याचे काम चालु आहे. अंबुरे व त्याच्या टोळईची दहशत मोडुन काढण्यासाठी त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिस प्रयत्न करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com