सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अधिकाऱ्यांवर दाखल करा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

पिंपरी : शहरातील होर्डिंग पडून दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे शहर शिवसेनेने केली आहे. 

पिंपरी : शहरातील होर्डिंग पडून दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे शहर शिवसेनेने केली आहे. 

शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, चिटणीस सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवराज कोकाटे, सचिन सानप, रोमी संधू, रेखा दर्शिले, विकेम वाघमारे आदींच्या शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त शिंदे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील अनेक होर्डिंग कोसळली आहेत. त्याखाली सापडून मोशी येथे प्रफुल्ल शहा आणि पुनावळ्यात कांताबाई भारती यांचा मृत्यू झाला; तसेच होर्डिंगमुळे अनेक दुकाने, टपऱ्या व घरांचे नुकसान झाले आहे. मोशी व पुनावळेतील बहुतांश होर्डिंग अनधिकृत व नियमबाह्य आहेत. असे होर्डिंग प्रचंड व अवजड आहेत. काहींचा चौकांमधील वाहतुकीला अडथळा होत आहे. आणखी काही गंभीर घटना घडू नयेत, यासाठी अनधिकृत होर्डिंग आणि पडलेल्या होर्डिंगचा पंचनामा करून दोषींवर कारवाई करावी. 
 
Web Title: File against crime officer

टॅग्स