डॉक्टर पत्नीवर बंधने घालणाऱ्या डॉक्टरसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

पतीला विवाहबाह्य संबंधांविषयी विचारणा करणाऱ्या उच्चशिक्षित महिला दंतवैद्यकास मारहाण करणे, जातीवरून अपमानित करणे आणि बंधने घातल्याप्रकरणी पतीसह त्याच्या एकूण चार नातेवाईकांविरूध्द गुन्हा दाखल.
crime
crimesakal
Summary

पतीला विवाहबाह्य संबंधांविषयी विचारणा करणाऱ्या उच्चशिक्षित महिला दंतवैद्यकास मारहाण करणे, जातीवरून अपमानित करणे आणि बंधने घातल्याप्रकरणी पतीसह त्याच्या एकूण चार नातेवाईकांविरूध्द गुन्हा दाखल.

दौंड - पतीला विवाहबाह्य संबंधांविषयी विचारणा करणाऱ्या उच्चशिक्षित महिला दंतवैद्यकास मारहाण करणे, जातीवरून अपमानित करणे आणि बंधने घातल्याप्रकरणी दौंड शहरातील डेंटिस्ट पतीसह त्याच्या एकूण चार नातेवाईकांविरूध्द अ‍ॅट्रॉसिटी व नागरी हक्क संरक्षण कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. दंतवैद्यक डॉ. भावना सदानंद धुमाळ यांनी या बाबत फिर्याद दिली आहे. डॉ. भावना व डॅा. सदानंद यांचा प्रेमविवाह असून दोघेही प्रथितयश दंतवैद्यक म्हणून कार्यरत आहेत. २८ मार्च रोजी डॉ. भावना यांनी डॉ. सदानंद यांना विवाहबाह्य संबंधाविषयी विचारले असता डॉ. सदानंद यांनी टाळाटाळ केली. वादंग वाढल्यानंतर 'तुझ्याशी लग्न करून पस्तावलो असून यापुढे माझ्या जीवनात तूझे कोठेही स्थान नाही', असे सुनावले होते.

त्याचबरोबर सासरच्या मंडळीने जातीवरून अपमानित करून घराच्या हॅाल मधील टीव्ही पाहणे, डायनिंग टेबलवर जेवणे आणि वाहन वापरण्यास मज्जाव केला. पगाराचे पैसे आणि दवाखान्यातील रक्कम जमा करण्यासाठी दबाव टाकला होता.` तुझ्यापेक्षा चांगल्या स्त्रिया मला मिळतील', असे सांगून शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार सदानंद आप्पा धुमाळ (पती), आप्पा लक्ष्मण धुमाळ (सासरा), वत्सला आप्पा धुमाळ (सासू , तिघे रा. धुमाळ मॅन्शन, गोपाळवाडी रोड, दौंड), दयानंद आप्पा धुमाळ (दीर) व सुनिता दयानंद धुमाळ (जाऊ, दोघे रा. बेकनाळ, जि. कोल्हापूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही अटक केली नसून पोलिस उप अधीक्षक पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com