बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांना शिक्षा?

baba.jpg
baba.jpg

पुणे : कोरोनाबाधित व्यक्तीवर पतंजलीने तयार केलेल्या औषधाने उपचार केल्यास ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते, असा दावा करणारे बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याविरोधात जुन्नर येथील प्रथमश्रेणी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता औषध तयार करून विक्रीस उपलब्ध करणे या सगळ्या प्रक्रियेत बेकायदेशीरता व फसवणूक असल्याने न्यायालयात तक्रार दाखल केल्याचे तक्रारदार मदन कुऱ्हे यांनी सांगितले.

कोरोना विषाणू विरोधातील औषध शोधून काढल्याचा रामदेव बाबाच्या दाव्या राज्यात दाखल झालेली ही पहिलीच तक्रार आहे. कुऱ्हे यांनी अॅड.असीम सरोदे यांच्यामार्फत ही न्यायालयीन तक्रार दाखल केली आहे. कोणत्याही क्लिनिकल चाचण्या न घेता तसेच आयसीएमआर व आयुष मंत्रालयाची परवानगी न घेता, 'कोरोनील व स्वासारी' औषधांची उपयुक्तता वैज्ञानिक दृष्टीकोणातून सिद्ध न करता थेट बाजारात विक्रीसाठी आणले.

भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 120(ब), 270, 504, 34, तसेच 'ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिरात) कायदा 1954' कायद्यातील कलम 3 व कलम 4 व 5 ,रोगाचा संसर्ग वाढविणारी कृती रोखणारा कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार काढण्यात आलेले नोटिफिकेशन यातील तरतुदींचे स्पष्ट उल्लंघन करणारी बेकायदेशीर कृती बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजलीने केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

कोरोना काळात नागरिकांच्या मनातील भीतीचा फायदा पैसा कमविण्यासाठी होऊ शकतो याची पक्की माहिती असलेल्यांनी आपसात संगनमताने केलेले हे कृत्य असल्याचा आरोप तक्रारीतून केल्याचे अॅड.असीम सरोदे यांनी सांगितले. 

शिक्षा सूनवण्याची मागणी : 
21 एप्रिल रोजी आयुष्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना, कोविड-19 संदर्भात औषध शोधल्याचे दावे करू नये, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने 24 मार्च 2020 रोजी जाहीर पत्रक काढले. या अनेक कायदेशीर सूचनांचा देखील बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी अपमान केला आहे. त्यामुळे त्या दोघांविरोधात नोटीस जारी करावी, त्यांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा सूनवावी, अशा मागण्या तक्रारीत करण्यात आलेल्या आहेत, असे कुऱ्हे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com