वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या विरोधात गुन्हा दाखल 

संदीप घिसे 
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पिंपरी (पुणे) : महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील एका डॉक्टरला मिळणाऱ्या पदोन्नतीपासून रोखण्यासाठी कटकारस्थान रचून बदनामी केल्याप्रकरणी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी (पुणे) : महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील एका डॉक्टरला मिळणाऱ्या पदोन्नतीपासून रोखण्यासाठी कटकारस्थान रचून बदनामी केल्याप्रकरणी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. के. अनिल रॉय व डॉ. हेमंत चिखलीकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. डॉ. शंकर बळवंत जाधव (वय ५३, रा. मोनिका अपार्टमेंट, संघवी नगर, औंध) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालयांमध्ये फिर्यादी डॉ. जाधव यांनी दावा दाखल केला होता. त्यामध्ये संशयित आरोपींनी त्यांच्या पदाचा आरोपी डॉक्टरांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून डॉ. जाधव यांना मिळणाऱ्या पद्धतीमध्ये अटकाव केला. तसेच डॉ. जाधव यांची ई मेल पोर्टवर बदनामीकारक मजकूर पाठवला.

वायसीएम रुग्णालयात उपअधीक्षक या पदावर नेमणूक होण्याबाबतचे पत्र देऊन त्यामध्ये जातीचा उल्लेख केला. तसेच त्यांना वारंवार त्रास दिला. याबाबत न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी अंती डॉ. चिखलीकर आणि डॉ. अनिल रॉय यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पिंपरीचे साहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील करीत आहेत.

Web Title: filed an offense against Medical Officer Dr. Anil Roy