चाहत्याने जपलाय चित्रपटसृष्टीचा ठेवा

Sndeep-Boyat
Sndeep-Boyat

संदीप बोयत यांच्या पोस्टाची तिकिटे, पोस्टर्स संग्रहाची लिम्का बुकमध्ये नोंद
पुणे - भारतीय चित्रपटसृष्टीला १०० पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनेकांच्या स्मरणात राहण्यासारखा आहे. अनेक चाहते चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांच्या आठवणी आजही जपतात. संदीप बोयत या चाहत्याने या आठवणी संग्रहित करून ठेवल्या असून, त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

पोस्टाने चित्रपटसृष्टीवर आधारित १९४७ पासून आतापर्यंत काढलेल्या २५० तिकिटांचा संग्रह संदीप यांच्याकडे आहे. त्या सोबतच जुन्या चित्रपटांच्या चित्रफिती व पोस्टरचा संग्रहसुद्धा त्यांनी केला आहे. संदीप यांच्या संग्रहातून चित्रपटसृष्टीला उजाळा मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या संग्रहाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.

या कार्याचा गौरव अनेक चित्रपट व नामवंत संस्थांनी केला आहे. संदीप यांनी आतापर्यंत अनेक कलाकारांसोबतच्या आठवणीही जपल्या आहेत. त्यांच्याकडे हिंदी व दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते मोतीलाल, नागेश, मेहमूद, आर. डी. बर्मन आदी अभिनेते व कलाकारांची पोस्टाची दुर्मीळ तिकिटे आहेत. तसेच ‘जीना तेरी गली मे, ‘लाल दुपट्टा मलमल का’, ‘हिमालय की गोद मे’, ‘सूर संगीत’ अशा अनेक जुन्या गाजलेल्या चित्रपटांच्या पोस्टाच्या तिकिटांचा संग्रहही आहे. संदीप राजकपूर व धर्मेंद्र यांचे चाहते असून, त्यांच्या स्वाक्षऱ्या, फोटोही ठेवले आहेत.
चित्रपट निर्मिती क्षेत्रात ते कॅमेरामन म्हणून काम करतात. त्यांचे वडील रमेश बोयत हे सुद्धा चित्रपटसृष्टीत सहायक कॅमेरामन म्हणून काम करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com