सर्वेक्षणानंतर विकास आराखडा विश्‍लेषणाचे काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

पुणे - पुरंदर येथील विमानतळासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या (ओएलएक्‍स) विश्‍लेषणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विमानतळासाठी नेमकी किती व कोणती जागा लागणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर डीपीआर (सर्वंकष विकास आराखडा) तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

पुणे - पुरंदर येथील विमानतळासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या (ओएलएक्‍स) विश्‍लेषणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विमानतळासाठी नेमकी किती व कोणती जागा लागणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर डीपीआर (सर्वंकष विकास आराखडा) तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

पुण्यासाठी नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर येथील जागा राज्य सरकारने निश्‍चित केली आहे. पहिल्या टप्प्यात या जागेचे एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडून ‘ओएलएक्‍स’ सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. यात विमानतळासाठी लागणारी जागा आणि त्यामध्ये येणारे संभाव्य अडथळे यांचा अभ्यास करण्यात आला आहे. या सर्वेक्षणाचे विश्‍लेषण करण्याचे काम सध्या सुरू आहेत. हे काम येत्या आठवडाभरात पूर्ण होईल. त्यातून विमानतळासाठी नेमकी किती जागा लागणार आहे, त्यात कोणती गावठाणे आणि गावे जाणार आहे, सरकारी जमिनी किती लागणार आहे, आवश्‍यकतेनुसार करावे लागणारे बदल, यांची माहिती स्पष्ट होणार असल्याचे एअरपोर्ट ॲथॉरिटीच्या सूत्रांनी सांगितले.

हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर डीपीआर (विकास आराखडा) तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रनवे कोणत्या बाजूला असणार आहे, कार्गो हब, कमिर्शियल बिल्डिंग कुठे असणार आहेत इत्यादी गोष्टींचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी निविदा मागवून सल्लागार कंपनी नेमण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. डीपीआर करण्याच्या कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून निविदा मागविण्यात आल्या आहे. त्याचवेळी जागामालकांना भरपाई देण्यासंदर्भातील पॅकेजही तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The final phase of work on the analysis of the survey plan development