आता उत्सुकता अंतिम फेरी अन्‌ परीक्षकांची

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे आयोजित ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (ता. १६) होणार आहे. याचे परीक्षण करण्यासाठी परीक्षकही तेवढेच ताकदीचे आहेत.

पुणे - ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धेत अंतिम फेरीत पोचलेल्या तरुणींची क्राऊन जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यांचे ग्रुमिंग आणि ट्रेनिंगही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेसह परीक्षकांबाबतही राज्यात कुतूहल निर्माण झाले आहे. आता परीक्षकही अंतिम फेरीचे परीक्षण करण्यासाठी उत्सुक आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

पुणे - ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धेतील अंतिम फेरीतील तरुणींसमवेत (डावीकडून) ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१८’ची द्वितीय विजेती प्रिया सिंग आणि ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक. #esakalphoto #sakalbeautyofmaharashtra2019 #beauty #sakal #final #priyasingh #pune #Maharashtra

A post shared by eSakal (@esakalphoto) on

‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे आयोजित ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (ता. १६) होणार आहे. याचे परीक्षण करण्यासाठी परीक्षकही तेवढेच ताकदीचे आहेत.

अंतिम फेरीसाठी मॉडेल आणि अभिनेत्री मुग्धा गोडसे, अभिनेता सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, स्मिता गोंदकर, नियती जोशी, रेशम टिपणीस, मृण्मयी कोळवलकर, सई लोकूर आणि डॉ. रेणू गाडगीळ हे परीक्षक असणार आहेत. त्यांनाही या स्पर्धेविषयी उत्सुकता लागली आहे.

Web Title: Final Round of Sakal Beauty of Maharashtra 2019