अंतिम मतदारयादी आज जाहीर होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

पुणे - महापालिकेच्या आगामी निवडणुकीची अंतिम मतदारयादी शनिवारी (ता. २१) जाहीर होणार आहे.  प्रारूप मतदारयादीनुसार सुमारे २६ लाख ४२ हजार मतदार असून, त्यात काही वाढ होईल, असा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्त केला. 

महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या आठवड्यात प्रारूप मतदारयादी जाहीर केली आहे. मतदारयादीबाबत हरकती-सूचना मागून त्यावर अंतिम सुनावणी झाली आहे. अंतिम मतदारयादी तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले असून, शनिवारी सकाळी अकरा वाजता ती जाहीर केली जाईल. महापालिकेच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Web Title: final voting list declare today