पुणे - अखेर सांगवीत आयुक्तांनी केली जलपर्णीची पहाणी

रमेश मोरे
बुधवार, 18 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीकर मुळा नदीपात्रातील जलपर्णीमुळे डासांच्या त्रासाने गेली तीन महिन्यांपासुन त्रस्त आहेत. प्रशासनाचे याकडे झालेले दुर्लक्ष जलपर्णी काढण्याची दिरंगाई यामुळे सांगवीकर नागरीकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासन जलपर्णी काढण्यासाठी दिरंगाई करत असल्याने नागरीकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

बोपोडी दापोडी पुलाजवळ भराव टाकल्याने संगमावरील दोन्ही नद्यांचा प्रवाह थांबल्याने मुळा नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. अखेर मंगळवारी (ता.१७) पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगवीला भेट देत येथील स्पायसर पुलावरून जलपर्णीची पाहणी केली. नागरीकांनी मा.आयुक्तांना जलपर्णी लवकरात लवकर काढण्यात यावी याबाबत मागणी केली. डासांच्या त्रासामुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याची कैफियत नागरीकांनी आयुक्तांसमोर मांडली. आयुक्तांनी तात्काळ जलपर्णी काढण्याचे आदेश देवुन ठेकेदारास सुचना करून जलपर्णी हटविण्याचे आदेश देण्यात येतील असे नागरीकांना आश्वासन दिले.

यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे,जवाहर ढोरे,शारदा सोनवणे,गणेश ढोरे, मधुबन मित्र मंडळाचे विजय बापू ढोरे, नरेंद्रभाऊ चौधरी, श्रीधर पंडित, नारायण हीरवे, हरिभाऊ गवळी, सुधाकर पवार, राजेश देशमुख, पंकज बोरा, सुभाष जाधव आदी नागरीक उपस्थित होते.

Web Title: Finally the commissioner come to examined jalparni