esakal | CoronaVirus : पळालेले 'ते' डॉक्‍टर अखेर 'होम क्वारंटाइन'
sakal

बोलून बातमी शोधा

Finally Doctors Home quarantine who came from mosco escaped due to coronavirus

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 15 डॉक्‍टर युरोपवारीला गेले होते. ते नुकतेच मॉस्कोतून परतले आहेत. पुण्याच्या विमानतळावर त्यांनी नजर चुकवून पळ काढला होता. त्यात पिंपरी-चिंचवडमधील तब्बल आठ डॉक्‍टर आहेत. या डॉक्‍टरांनी सहकार्य करण्याऐवजी माहिती देण्याचे टाळले.

CoronaVirus : पळालेले 'ते' डॉक्‍टर अखेर 'होम क्वारंटाइन'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : मॉस्कोतून परतलेल्या डॉक्‍टरांनी महापालिकेकडे स्वत:हून माहिती न देताच विमानतळावरून पळ काढल्याचा प्रकार उघडकीस आला. ही माहिती आरोग्य वैद्यकीय विभागास समजताच त्यांनी त्यांचा कसून शोध घेत त्यांना 'होम क्वांरटाइन' केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 15 डॉक्‍टर युरोपवारीला गेले होते. ते नुकतेच मॉस्कोतून परतले आहेत. पुण्याच्या विमानतळावर त्यांनी नजर चुकवून पळ काढला होता. त्यात पिंपरी-चिंचवडमधील तब्बल आठ डॉक्‍टर आहेत. या डॉक्‍टरांनी सहकार्य करण्याऐवजी माहिती देण्याचे टाळले. मात्र, पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी त्यांना वारंवार संपर्क साधला. त्यांचा शोध लागल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली. आता त्यांना 14 दिवसांसाठी 'होम क्वारंटाइन' केले आहे
 

चिंताजनक : पुण्यात स्थानिक महिलेला कोरोना; विदेश प्रवास नाही, कोणाशी संपर्क नाही!

loading image