अजित पवारांचे लोकेशन अखेर मिळालं !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पुणे : आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे कोठे आहेत याच्याच चर्चा असतानाच त्यांचं लोकेशन मिळालं असून ते नगरच्या कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार दुपारी बारामती आणि पुण्याच्या परिसरात होते. सायंकाळी ते अंबालिका कारखान्यावर गेले. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती, असं सांगण्यात येत आहे.

शरद पवार यांच्या समर्थनार्थ "राष्ट्रवादी'ने आज मुंबईसह राज्यभरात जोरदार शक्‍तिप्रदर्शन केले. मात्र, सायंकाळी पाच वाजता अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विधान भवनातील कार्यालयात जाऊन राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा ई-मेलद्वारे हरिभाऊ बागडे यांना पाठवण्यात आला व तो त्यांनी तातडीने मंजूर केला. 

राजीनाम्याचे कारण अस्पष्ट असले तरी अंतर्गत वाद शिगेला पोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधान भवनात राजीनामा दिल्यानंतर अजित पवार सुनील तटकरे यांच्यासोबत अज्ञातस्थळी रवाना झाले. त्यांनी सर्व खासगी सचिवांचे दूरध्वनी काढून घेतले. त्यांचा स्वत:चा दूरध्वनीदेखील "नॉट रिचेबल' होता. 

दरम्यान, अजित पवार यांचा राजकीय जीवनातील हा दुसरा राजीनामा आहे. याअगोदर उपमुख्यमंत्री असताना त्यांनी अशाचप्रकारे धक्‍का देत अचानक राजीनामा दिला होता. त्यानंतर आज ऐन विधानसभेच्या रणधुमाळीत आमदारकीचा राजीनामा देऊन "राष्ट्रवादी'ला धक्‍का दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finally found Ajit Pawars location