अखेर महापालिकेच्या विद्युत विभागाला आली जाग 

light.jpeg
light.jpeg


वाकडेवाडीतील दीड वर्षापासून बंद असलेले पथदिवे सुरू; कारण गुलदस्तात 

पुणे ः वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट ते अंडी उबवणी चौकापर्यंत सेवा रस्त्यावरील पथदिवे दीड वर्षापासून बंद असल्याचे वृत्त शुक्रवारी (2 जुलै) "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृत्ताची दखल घेत, तातडीने सेवा रस्त्यावरील सर्व पथदिवे सुरू करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे वाकडेवाडी, मुळा रस्ता येथील रहिवाशांना दिलासा मिळाल्याने त्यांनी "सकाळ'चे आभार मानले आहेत. 

वाकडेवाडी येथील सेवा रस्त्यावरील पथदिवे रस्ता तयार केल्यापासून फक्त जोडणीसाठी एक वर्षापासून बंदावस्थेत होते, त्यामुळे येथील परिसरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. येथील नागरिकांनी अनेक वेळा याबाबत महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या, पण अधिकाऱ्यांनी नेहमीच टोलवाटोलवी करीत हात वर केले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. कोणालाही न जुमानता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील पथदिवे क्षुल्लक कारणासाठी बंद ठेवले होते. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच सेवा रस्त्यावर जोडणीचे काम सुरू करण्यात आले. रात्रीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत येथील सर्व पथदिवे सुरू केले जातील, असे महापालिकेच्या विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता अशोक केदारी यांनी "सकाळ'ला सांगितले. 

येथील पथदिव्यांच्या जोडणीच्या कामाला सुरवात झाल्यानंतर येथील स्थानिक नगरसेविका सोनाली लांडगे, सामाजिक कार्यकर्ते अब्रार काझी, बिलाल काझी, रवींद्र नितनवरे, संजय खडसे, तुषार गांधी, प्रशांत ओसवाल, अतुल खोपटकर आदींसह परिसरातील यांनी "सकाळ'ला विशेष धन्यवाद दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com