'फायनान्स मीट इन डेटा डॉक्टर' विषयावर चर्चासत्र

lecture
lecture

लोणी काळभोर (पुणे) : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलाजी विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (मिटकॉम) तर्फे 'फायनान्स मीट इन डेटा डॉक्टर' यावर विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू सुनील राय, क्रेडिट सुइज्जचे सहाय्यक अध्यक्ष संकेत शहा, नेक्स जन कंपनीचे संस्थापक विनोद कशप आणि मीटकॉमचे विभाग प्रमुख विवेक सिंग आदी उपस्थित होते.

यावेळी पीएमएस मॅनेजमेंट आणि मुंडे-शहा कंपनीचे प्रमुख प्रकाश पटवर्धन म्हणाले,"देशामध्ये लागु केलेल्या वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) करदात्यांना करभरणा, विवरणपत्र, करनिर्धारण, लेखापरीक्षण तसेच वेगवेगळ्या विभागाकडे कर भरणा करण्यासाठी होणारा त्रास कमी झाला आहे. वाणिज्य क्षेत्रामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जीएसटी करप्रणाली ही रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देणारी ठरणार आहे. व्यापार वाढीसाठी व योग्यप्रकारे नियोजन, पारदर्शकता, संगणकीकरण तसेच भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी 'एक देश, एक कर' या कायद्याची आवश्यकता होती. संगणकीकरणामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला असून या करप्रणालीमुळे व्यवहारात सुसूत्रता आली आहे. जीएसटी मुळे भ्रष्टाचार व कर चुकवेगिरीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे. भविष्यात या करप्रणालीतून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

यावेळी संकेत शहा म्हणाले,"बँकिंग क्षेत्रात गुंतवणुकीचे प्रमाण वाढते व त्यावरून बाजाराचे निर्णय ठरतात. या क्षेत्रात रोजगाराच्या आणि कंपनीच्या वाढीसाठी सध्याला पोषक वातावरण आहे. देशात अनेकांकडे पैसा आहे, मात्र त्याच्याकडे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी ज्ञानाची व अनुभवाची कमतरता असते. सध्याला हे क्षेत्र स्टार्ट अप होत असून भविष्यात फीनटेक बँकिंग क्षेत्र विस्तारणार आहेत. यात कोणाचीही मालकी नसल्यामुळे काम करणारा स्वतः मालक असणार आहे त्यामुळे कौशल्य असणाऱ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असणार आहे."

यावेळी विनोद कश्यप म्हणाले,"बॉल्क चेन ही संकल्पना प्रथम बँकिंग क्षेत्रात हैद्राबादमध्ये येथे वापरली गेली. बँकिंग क्षेत्रातील ट्रान्जेक्शन मधील बदलाचे काम बॉल्क चेनच्यामाध्यमातून केले जात आहे. भविष्यात बँकिंग क्षेत्रात याला फार महत्व असेल. इन्शुरंन्समध्ये देखील क्लेम करण्यासाठी या संकल्पनेचा वापर होत आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com