कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील असंघटीत कामगारांची माहिती श्रम मंत्रालय आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मागवली आहे. गृहनिर्माण संस्थांनी आणि घरातील स्वयंपाक, धुणीभांडी, स्वच्छता, झाडूकाम करणाऱ्या आणि वाहनचालक या सर्व कामगारांची माहिती चार एप्रिलपर्यंत विहित नमुन्यात द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिव यांना केले आहे.
पुणे : स्वयंपाक, धुणीभांडी, स्वच्छता, झाडूकाम आणि चालक या कामगारांना 'पंतप्रधान श्रमयोगी मानधन' या पेन्शन स्कीममधून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील असंघटीत कामगारांची माहिती श्रम मंत्रालय आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मागवली आहे. गृहनिर्माण संस्थांनी आणि घरातील स्वयंपाक, धुणीभांडी, स्वच्छता, झाडूकाम करणाऱ्या आणि वाहनचालक या सर्व कामगारांची माहिती चार एप्रिलपर्यंत विहित नमुन्यात द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिव यांना केले आहे.
dculo-mh@gov.in , ddrcspune@gmail.com किंवा punefed@gmail.com या इमेल वर ही माहिती पाठवावी.
विहित नमुन्यातील भरावयाची माहिती :
1.गृहनिर्माण सोसायटीचे नाव, पूर्ण पत्ता पिनकोडसह, नोंदणी क्रमांक
2.सोसायटीमधील एकूण सदनिका
3. धुणी-भांडी, स्वच्छता, झाडूकाम आणि चालक या कामगारांची नावे
4. कामगारांचे आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख, रेशन कार्डचा प्रकार (पिवळे, केशरी) , रेशनकार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक
5. गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष किंवा सचिव यांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक :
सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ
9422004701
मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन
आपत्कालीन परिस्थितीत गृहनिर्माण संस्थांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.
'सहकार दरबार' बंद राहणार
पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ यांचे कार्यालय आणि 'सहकार दरबार' 14 एप्रिलपर्यंत बंद राहील, अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी दिली.