esakal | बनावट कागदपत्रांद्वारे भागीदार बनवून बांधकाम व्यावसायिकाची केली आर्थिक फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime-Scene

लाचलुचपत विभागाने कारवाई केलेल्या अमरावतीच्या नगररचना विभागाचा सहसंचालक हनुमंत नाझिरकर याच्या पत्नीसह नऊ जणांनी बांधकाम प्रकल्पासाठी बनावट कागदपत्रांद्वारे भागीदार बनवून बांधकाम व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे भागीदार बनवून बांधकाम व्यावसायिकाची केली आर्थिक फसवणूक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - लाचलुचपत विभागाने कारवाई केलेल्या अमरावतीच्या नगररचना विभागाचा सहसंचालक हनुमंत नाझिरकर याच्या पत्नीसह नऊ जणांनी बांधकाम प्रकल्पासाठी बनावट कागदपत्रांद्वारे भागीदार बनवून बांधकाम व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संगीता हनुमंत नाझिरकर, चंद्रकांत गरड, दिलीप कास्टीया, देवेश जैन, रवींद्र जैन, समीर जैन, राजेंद्र ओसवाल, ऋषभ ओसवाल, सय्यद सुलतान इनामदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संग्राम तानाजी सोरटे (वय 44, रा. बारामती) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये 'ती' गेल्या सहा महिन्यांपासून लावतेय जिवाची बाजी

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची जमीन खरेदी-विक्री, विकसनाचा व्यवसाय करतात. ते व त्यांचे नातेवाईक मधुकर भरणे यांनी भागीदारीमध्ये ओम साई डेव्हलपर्स नावाची कंपनी सुरू केली. त्यामध्ये भरणे यांचे नातेवाईक असलेल्या हनुमंत नाझिरकर याच्या ओळखीच्या चंद्रकांत गरड व नाझीरकरच्या पत्नीला भागीदार करून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी धायरी येथे घेतलेल्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प सुरू करायचा होता.

35 व्या वर्षी केला गुन्हा आणि 55 व्या वर्षी सापडला

दरम्यान, फिर्यादी संबंधित जमीन पाहण्यासाठी गेले तेव्हा, त्यांना तेथे असलेल्या दिलीप कास्टीया, रवींद्र जैन, समीर जैन, देवेश जैन, राजेंद्र ओसवाल, ऋषभ ओसवाल फिर्यादींसाठी अनोळखी असलेल्या व्यक्ती भेटल्या. त्यांना विचारणा केल्यानंतर, त्यांनी आपण ओम साई डेव्हलपर्सचे भागीदार असल्याचे सांगून त्यासंबंधीची भागीदारी पत्र व करारनामा यांसारखी कागदपत्रे दाखविली. हा प्रकार संगीता नाझिरकर हिने फिर्यादीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना भागीदारी दिल्याचे आढळून आले. भरणे यांनाही याबाबत काही माहिती नव्हते. संगीता नाझिरकर व गरड यांनी संगनमत करून, कट रचून फिर्यादी यांनी आर्थिक नुकसान व्हावे आणि त्यांना आर्थिक फायदा व्हावा, या उद्देशाने आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादी यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात अर्ज दिला. हा अर्ज सिंहगड पोलिस ठाण्याकडे वर्ग होऊन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

Edited By - Prashant Patil