दिवाळीनिमित्त माजी सैनिकांना आर्थिक मदत 

दिवाळीनिमित्त माजी सैनिकांना आर्थिक मदत 

पुणे : भारतीय सैन्य दलांतील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी रेड कार्पेटवरून चालण्याचा मान अनुभवला. दिवाळीनिमित्त पिंक लोटस क्‍लब आणि वेंकॉब संस्थेतर्फे आयोजित "सैन्य दिवाळी - सितारे सरहद के' या दिमाखदार कार्यक्रमात या माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. बॅंडच्या तालबद्ध मानवंदनेत आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हा हृद्य कार्यक्रम रंगला. 

खडकीतील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रातील 91 दिव्यांग सैनिकांना ट्रॅक सूट, तिथे राहणाऱ्या 34 कुटुंबांना मिक्‍सर, प्रेशर कुकर आणि 12 शिवणयंत्रे या वेळी देण्यात आली. शहीद जवान सताप्पा पाटील यांच्या पत्नी अश्विनी यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक मदत, तर सौरभ फराटे यांच्या जुळ्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना क्‍लबने सुरू करून दिली. त्याची कागदपत्रे वीरपत्नी सोनाली फराटे यांना देण्यात आली. शहीद जवान श्रेयस गलांडे यांच्या मुलांच्या वैद्यकीय खर्चासाठीची आर्थिक मदत वीरपत्नी निशा गलांडे यांना स्वीकारली. वीरपत्नी ज्योती विधावे यांना व्यवसायासाठी मदत करण्यात आली. शहीद जवान श्रीकांत वैद्य यांच्या मुलांच्या संगीत शिक्षणासाठी क्‍लबने वीरपत्नी केतकी वैद्य यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्त केली. सीमेवरील जवानांसाठी सन्मानपत्र, दिवे, मिठाई, सुकामेवा अशी भेट सीमेवर पाठविण्यात आली. सैनिक मित्र परिवाराचे किरण पाटोळे यांनी ती स्वीकारली. 

सत्येंद्र राठी यांनी प्रास्ताविक केले. निवृत्त लष्करी अधिकारी योगेश व सुमेधा चिथाडे यांचा सत्कार करण्यात आला. क्‍लबच्या महिला सदस्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सरिता मुंदडा, वंदना डागा आणि शालिनी दहाड यांनी संयोजन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com