'बस नादुरुस्त झाल्यास पाच हजार रुपये दंड'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

पुणे - मार्गावर धावताना बस नादुरुस्त झाल्यास खासगी ठेकेदारांना प्रतिबस पाच हजार रुपये दंड करण्याचा निर्णय पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी घेतला. येत्या रविवार (ता. १६) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

पीएमपीच्या सुमारे ३०० बस रोज मार्गावर धावताना नादुरुस्त होतात. त्यातील १५० बसचे बिघाड गंभीर स्वरूपाचे असतात. त्यात खासगी ठेकेदारांच्या बस नव्या असूनही त्यांच्या बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बंद पडणाऱ्या बसची डोकेदुखी दूर करण्यासाठी दंडाची ‘मात्रा’ शोधण्यात आली आहे.

पीएमपीच्या ताफ्यात पाच खासगी ठेकेदारांच्या सुमारे ८५३ बस आहेत. त्यातील ७५० बस दररोज मार्गांवर धावतात. यापैकी १५० बस रोज नादुरुस्त होतात. त्यातील ५०-७० बस दुरुस्तीसाठी प्रत्येकी एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे त्याला ‘मेजर ब्रेकडाऊन’ म्हटले जाते. नव्या आदेशाप्रमाणे, एखाद्या मार्गावरील बस नादुरुस्त झाली आणि एक तासापेक्षा जास्त वेळ ती बंद असेल, तर त्या बसला ५ हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. बस एक तास बंद राहिली तर पीएमपीला किमान १०-१२ हजार रुपयांचे नुकसान होते, हे लक्षात घेऊन दंडाची रक्कम ठरविण्यात आली आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले. बसमधील बिघाड किरकोळ स्वरूपाचा असेल तर त्यावेळी दंड होणार नाही, असे नमूद केले आहे. नादुरुस्त झालेल्या बस दुरुस्त करण्यासाठी खासगी ठेकेदारांकडे ५ क्रेन आहेत. एकूण बसच्या तुलनेत त्यांची संख्या कमी असल्याचे मत प्रशासनाने व्यक्त केले. 

‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण जास्त
पीएमपीच्या १२०० पैकी ७५० बस रोज मार्गांवर धावतात. त्यातील १५० बस रोज नादुरुस्त होतात. सुमारे ७५ बसमधील बिघाड गंभीर स्वरूपाचा असतो. बंद पडणाऱ्या बस दुरुस्त करण्यासाठी पीएमपीकडे १७ क्रेन आहेत; परंतु ताफ्यातील बहुसंख्य बसचे आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे आणि त्या जुन्या झाल्यामुळे वारंवार बंद पडतात. परिणामी पीएमपीचे ‘ब्रेक डाऊन’चे प्रमाण जास्त असल्याचे भासते. खासगी ठेकेदारांच्या बस नव्या असूनही त्या वारंवार बंद पडतात. कारण, त्यांच्या बसची देखभाल-दुरुस्ती योग्य प्रकारे होत नाही, या कडेही प्रशासनातील एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

Web Title: fine of Rs five thousand for bus fail