चिंचवडमध्ये तीन घरमालकांना दंड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

पिंपरी : घरमालकाने भाडेकरूंची माहिती दिली नाही. त्यामुळे चिंचवड पोलिसांनी घरमालकांवर खटला भरला. न्यायालयाने त्या तीन घरमालकांना दंड ठोठवल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी दिली. 
अनेकदा घरमालक भाडेकरू ठेवतात. भाडेकरूंची त्यांची माहिती पोलिसांना देणे कायद्याने बंधनकारक असूनही मालक ती देत नाहीत. अशा घरमालकांना शोधून त्यांच्यावर खटला दाखल करण्याची मोहीम पुणे पोलिसांनी हाती घेतली आहे. त्यानुसार भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या तिघांना न्यायालयाने दंड ठाठोवला आहे. अशीच मोहीम संपूर्ण शहरभर हाती घेतल्याची माहिती उपायुक्‍त शिंदे यांनी दिली. 

यापूर्वी कासारवाडी भागात काही दहशतवाद्यांनी खोली भाड्याने घेऊन वास्तव्य केले होते. तसेच काही सराईत गुन्हेगार खोली भाड्याने घेऊन राहतात. गुन्हा केल्यानंतर ते खोली सोडून निघून जातात. अशावेळी आरोपीला शोधायचे कसे, असा प्रश्‍न पोलिसांसमोर निर्माण होतो. तसेच भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकावरही कारवाई होते. जर भाडेकरूचे शासकीय ओळखपत्र आणि कायमचा पत्ता पोलिसांकडे असल्यास गुन्हा घडल्यावर त्याला शोधणे पोलिसांना सोपे होते. तसेच आपली माहिती पोलिसांकडे आहे, याचा धाकही भाडेकरूला राहतो. 

पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे म्हणाले, ""घरमालकाने रजिस्टर ऍग्रिमेंट केले की नाही, तसेच तो घराचा व्यावसायिक वापर करतो काय, याबाबत आम्हाला काहीही देणे-घेणे नसते. याबाबतची माहिती पोलिस अन्य कोणत्याही विभागास देत नाही. फक्‍त जर भाडेकरूने गुन्हा केल्यास त्याला शोधणे पोलिसांना सोपे होते. हाच यामागचा उद्देश आहे.'' 

शिंदे म्हणाले, ""पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसातून तीनवेळा नाकाबंदी केली जाते. एखाद्या दिवशी ठरावीक वाहने तपासणीच्या टार्गेटेड नाकेबंदीमुळे गुन्हे उघडकीस येण्यास मदत होते. अशी नाकाबंदी इतर पोलिस ठाण्यात राबविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र, गल्लीबोळातही ते लावणे पोलिसांना अशक्‍य आहे. दुकानदारांनी दोन कॅमेरे रस्त्याच्या दिशेने लावल्यास अनेक गुन्हे उघड होण्यास मदत होईल. आजपर्यंत खासगी आस्थापनांनी लावलेल्या कॅमेरांमुळे गुन्हे उघड होण्यास मदत झाली. परिसरातील सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत पोलिस चौकी स्तरावर बैठका घेण्याचे आदेशही दिले आहेत.'' 

Web Title: fine three homeowners in Chinchwad