सावंतवाडीत सकाळ रिलीफ फंडातून ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

उंडवडी : सावंतवाडी (ता. बारामती) येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती ॲग्रो व सकाळ रिलीफ फंडाच्यावतीने ओढा खोलीकरणाचे साडे नव्वशे मीटर लांबीचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या पावसाने ओढ्यात पावसाचे पाणी साचल्याने गावकरी समाधानी झाले आहेत. 

उंडवडी : सावंतवाडी (ता. बारामती) येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती ॲग्रो व सकाळ रिलीफ फंडाच्यावतीने ओढा खोलीकरणाचे साडे नव्वशे मीटर लांबीचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या पावसाने ओढ्यात पावसाचे पाणी साचल्याने गावकरी समाधानी झाले आहेत. 

गोजुबावी (ता. बारामती) हद्दीतील महसुली स्वतंत्र असलेल्या सावंतवाडी या गावाने 'पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत यंदा भाग घेतला होता. त्यानुसार स्पर्धेच्या कालावधीत येथे  विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. 
येथील कुरण ओढ्याचे खोलीकरण करण्यात यावे, यासाठी येथील ग्रामस्थांनी व तनिष्का व्यासपीठाच्या वतीने बारामती ॲग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार तसेच सकाळ रिलीफ फंडाकडे पोकलेन मशीन व डिझेल मिळावे, यासाठी पाठपुरावा केला होता.  त्यानुसार येथील ओढा खोलीकरणाच्या कामासाठी बारामती ॲग्रो व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या वतीने पोकलेन मशिन व सकाळ रिलीफ फंडातून दोन लाखाचे डिझेल देण्यात आले. त्यानुसार येथील कुरण ओढ्याचे  951 मीटर लांबी,  सरासरी 15 मीटर रुंदी व 1. 95 मीटर असे एकूण  27, 853 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. याकामामुळे 
2 कोटी 78 लाख लिटर 53 हजार लिटर एवढा पाणीसाठा होणार आहे. 

यंदा येथे पाणी फाउंडेशन उपक्रमाअंतर्गत विविध जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी अडून ते जमिनीत जिरल्याने दुष्काळ आणि पाणी टंचाई संपुष्टात येवून सावंतवाडी गाव पाणीदार होणार असल्याचा विश्वास येथील माजी उपसरपंच शरद सावंत, सामाजिक कार्यकर्ते कैलास सावंत, सूरज सावंत, विक्रम सावंत, येथील तनिष्का सदस्या वैशाली सावंत यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले. 

गावकऱ्यांनी 'सकाळ' चे मानले आभार
येथे नुकत्याच झालेल्या पावसाने येथील कुरण ओढ्यात पावसाचे पाणी साचले आहे. पावसाचे पाणी अडून ते जमिनीत जिरल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होवू लागली आहे.  त्यामुळे येथील ग्रामस्थांनी व तनिष्का व्यासपीठाच्या वतीने सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विशेष आभार मानले. 
 

Web Title: Finished work done by Sakal Relief Fund in Sawantwadi

टॅग्स