आदिनाथ सोसायटीच्या गार्डनमध्ये ससे, मत्स्यपालन केल्याप्रकरणी अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल

आदिनाथ सोसायटीच्या गार्डनमध्ये ससे, मत्स्यपालन केल्याप्रकरणी अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल

पुणे : स्वारगेट जवळील आदिनाथ सोसायटीच्या गार्डनमध्ये ससे व मत्स्यपालन करताना योग्य काळजी न घेता, त्यांचा छळ केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत (पेटा) दोघांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये सोसायटीचे अध्यक्ष व सचिवाचा समावेश आहे. 

अमित असित शहा (वय 38, रा. आदिनाथ सोसायटी, पुणे सातारा रस्ता, मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र जैन व सचिव राहुल विलास मेहता (दोघेही रा.आदिनाथ सोसायटी, पुणे सातारा रस्ता, मार्केट यार्ड) यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायदा (पेटा), वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची प्राणी सेवा नावाची संस्था आहे. या संस्थेमार्फत भटक्‍या, अपंग व जखमी प्राण्यांची काळजी व संगोपनाचे कार्य केले जाते. फिर्यादी रविवारी त्यांच्या आदिनाथ सोसायटीच्या गार्डनमध्ये फिरत होते. त्यावेळी त्यांना गार्डनच्या कोपऱ्यात एक लोखंडी जाळीचा पिंजरा आढळून आला. त्यामध्ये 50 ते 60 ससे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बहुतांश ससे पावसामध्ये भिजत व उपाशी होते. याबरोबरच तेथील पाण्याच्या टाकीमध्ये पाळीव मासे सोडण्यात आले होते. त्यांनाही ऑक्‍सिजन किंवा खाद्य दिलेले नव्हते. फिर्यादी यांनी याबाबत चौकशी केली. त्यावेळी सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडून ससे व मत्स्यपालन केले जात असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यांचे पालन करताना त्यांना योग्य त्या मूलभूत सुविधा पुरविणे, खाद्य देणे व त्यांची काळजी घेण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

ससे व मत्सपालन करताना त्यांची योग्य काळजी घेणे आवश्‍यक असतानाही दोघांनीही त्यांची काळजी घेतली नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com