आई-वडिलांचा सांभाळ न करणे पडणार महागात!

आई-वडिलांचा सांभाळ न करणे पडणार महागात!

लोणी काळभोर : वृद्ध आई व वडिलांचा सांभाळ करण्यास नकार दिल्याप्रकरणी कदम वाकवस्ती (ता. हवेली) येथील दोन सख्ख्या भावांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम कायदा अधिनियम २००७ चे कलम २४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

परशुराम भरत कांबळे व बाळासाहेब परशुराम कांबळे (रा. दोघेही, कवडीपाट, कदमवाकवस्ती ता. हवेली) ही गुन्हा दाखल झालेल्या सख्ख्या भावांची नावे असुन, भारत रघुनाथ कांबळे (वय- 64) यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान, आई-वडिलांचा सांभाळ न केल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल होण्याची लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पहिलीच घटना आहे. 

पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत कांबळे व त्यांच्या दोन्ही मुलांनी मिळून कवडीपाट टोलनाक्याजवळ जागा खरेदी करुन तीन खोल्यांचे घर बांधले. एका खोलीत भरत कांबळे व त्यांच्या पत्नी राहतात. तर उर्वरीत दोन खोल्यात परशुराम व बाळासाहेब आपल्या मुलाबाळासह राहतात. भरत कांबळे व त्यांच्या पत्नीला वय झाल्याने कामधंदा करता येत नाही. यामुळे उत्पन्न काहीही नसल्याने मागील दोन वर्षांपासून भरत कांबळे दोन्ही मुलांना आई-वडिलांचा सांभाळ करावा, अशी वारंवार विनंती करत होते. मात्र, दोन्ही मुलांनी सांभाळ करण्याऐवजी भरत कांबळे व त्यांच्या पत्नीला घराबाहेर हाकलून काढले.

वारंवार विनंती करुनही, मुले घरात घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर भरत कांबळे  यांनी पत्नीसह पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम कायदा अधिनियम २००७ चे कलम २४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार महेंद्र लोहार करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com