fire accident in dhankavadi flat fire Burn household items pune fire brigade
fire accident in dhankavadi flat fire Burn household items pune fire brigadesakal

Fire Accident : धनकवडीत बंद फ्लॅटला आग; घरगुती वापराच्या वस्तू जळून खाक

अग्निशमन दलाच्या जवानांनी फायर होज रील साह्याने पाण्याची लाईन तयार करून पाण्याच्या फवारा सुरू

धनकवडी : धनकवडीतील चैतन्यनगर कलानगर परिसरातील स्वप्नपूर्ती बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बंद फ्लॅट मध्ये शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान आग लागली होती. ही आग इलेक्ट्रिक सर्किट मुळे लागली आहे, अशी शक्यता कात्रज अग्निशमन दलाने व्यक्त केली.

सदर फ्लॅट बंद अवस्थेत होता. येथे राहणारे बाहेरगावी गेलेले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग मोठ्या प्रमाणात फ्लॅटमधील किचन आणि हॉल मध्ये लागलेली होती. आणि खिडक्यांमधून जाळ बाहेर येत होता.

अग्निशमन दलाच्या जवानांनी फायर होज रील साह्याने पाण्याची लाईन तयार करून पाण्याच्या फवारा सुरू केला. आगीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नियंत्रण कक्षाकडून गंगाधाम अग्निशमनकेंद्राची पाण्याची गाडी मागविण्यात आली.

fire accident in dhankavadi flat fire Burn household items pune fire brigade
Fire Brigade Fee : राज्यात आता सरसकट एकच ‘अग्निशामक व आपत्कालीन सेवा’ शुल्क लागू

अन आग कंट्रोल केली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घरात शिरून आतल्या वस्तूंवर पाणी मारून आग पूर्णपणे विजविली. नंतर पूर्ण थंड केले. लागलेल्या आगीमध्ये किचनमधले सर्व सामान फर्निचर, फ्रिज,ओव्हन, घरगुती वापराच्या वस्तू तसेच हॉलमधील टीव्ही, एसी, फर्निचर असे दोन्ही रूम मधले इलेक्ट्रिक वस्तू पूर्णपणे जळाल्या होत्या.

fire accident in dhankavadi flat fire Burn household items pune fire brigade
Pune : दोन किलोमीटर रस्त्यासाठी अर्धा तास, बिबवेवाडीतील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

अग्निशामन दलाची मदत पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी कुलूप तोडून दरवाजा उघडून किचन मधला एलपीजी सिलेंडर बाहेर काढून थंड केला. सदर आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून संबंधित व्यक्तीचे अंदाजे आगीमध्ये मौल्यवान वस्तू जळाल्या अंदाजे दहा ते पंधरा लाखाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी कात्रज अग्निशमन दलाचे प्रमुख संजय रामटेके, तांडेल अमोल कर्डेकर, फायरमन जयवंत तळेकर, पंकज इंगवले, मदतनीस फायरमन निलेश राजवडे आणि ड्रायव्हर घटनास्थळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com