जळीतग्रस्तांना चादरीचे छप्पर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

बिबवेवाडी - मार्केट यार्डातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर झोपडपट्टीला आग लागून ७४ झोपड्या खाक झाल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण झाला, तरीसुद्धा जळीतग्रस्तांची परीस्थिती ‘जैसे थे’च आहे. महापालिका प्रशासनाने लाकडी वासे व पत्रे देण्याची मदत केली; परंतु जळीतग्रस्त कुटुंबांनी प्रशासनाची मदत नाकारून पक्की घरे बांधून देण्याची मागणी केली आहे. सध्या या कुटुंबांनी मंदिर-मशिदीत आश्रय घेतला असून, काहींनी चादरीचे छप्पर करून त्याखालीच संसार मांडला आहे.

आंबेडकरनगरमध्ये लागलेल्या आगीत ७४ झोपड्या पूर्णपणे खाक झाल्या होत्या. त्यामुळे या कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले. महापालिका प्रशासनाने या जळीतग्रस्तांना राहण्यासाठी आंबा महोत्सवाच्या जागेमध्ये व्यवस्था केली होती; परंतु राहण्याची जागा लांब असल्यामुळे जळीतग्रस्त तेथे गेले नाहीत. ते झोपडपट्टीमध्येच मशीद व समाजमंदिरांचा आधार घेऊन राहिले. जळालेल्या घरांच्या जागांची साफसफाई करून त्या ठिकाणी तात्पुरते फ्लेक्‍स व चादरींचे छप्पर करून त्याखालीच या कुटुंबांनी आश्रय घेतला आहे. यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत असून कोणापुढे तक्रार करायची, कहाणी सांगायची, अशी भावना महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. अनेक सेवाभावी संस्था व राजकीय पक्षांनी जळीतग्रस्तांना संसारपयोगी वस्तू व काही प्रमाणात आर्थिक मदत केली; परंतू वस्तू ठेवण्यासाठी छप्परच नसल्यामुळे वस्तूंचे करायचे काय, असा सवाल ही कुटुंबे करीत आहेत.

Web Title: fire affected home roof