पुण्यात बाजीराव रस्त्यावरील इमारतीत आग; अडकलेल्यांची सुखरूप सुटका (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

पुणे : बाजीराव रस्त्यावरील मेहुणपूराजवळील एका इमारतीला गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजता आग लागली. अग्निशामक दलाच्या 7 गाड्यानी ही आग आटोक्यात आणत इमारतीमधील रहिवाशांची सुटका केली

पुणे : बाजीराव रस्त्यावरील मेहुणपूराजवळील एका इमारतीला गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजता आग लागली. अग्निशामक दलाच्या 7 गाड्यानी ही आग आटोक्यात आणत इमारतीमधील रहिवाशांची सुटका केली.

प्रभात चित्रपटगृहासमोरील गल्लीतील जोशी संकुल या इमारतीस आग लागल्याची खबर अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 7 फायरगाड्या तत्काळ घटनास्थली दाखल झाल्या. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाल्याने इमारतीमधील रहीवाशी भितीपोटी पाच मजल्याच्या या इमारतीच्या टेरेसवर जाऊन मदतीसाठी प्रयत्न करु लागले.

जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवित टेरेसवर थांबलेल्या नागरिकांची सुटका केली. याबरोबरच इमारतीमध्ये राहणाऱ्या 25 कुटुंबाना सुखरूप बाहेर काढले. आग विझविण्यात आली असून अग्निशामक दलाकडून आता कुलिंग करण्याचे काम सुरु आहे.

Web Title: A fire in the Bajirao road building in Pune

टॅग्स