
आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा असल्याने ही आग पसरत गेली असल्याचा अंदाज अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी माहिती देताना व्यक्त केला.
पुणे: घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनीत शारदा क्लिनिक समोरील दीपक ऑटोमोबाईल दुकानातील गोडाऊनला आज सकाळी 7:30 ते 8 च्या दरम्यान, भीषण आग लागली. या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र, गोडाऊन मधील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आग लागल्याची माहिती स्थानिक कार्यकर्ते विक्रम मोरे यांनी अग्निशमन दलास तत्काळ दिली. घटनेची माहिती मिळताचजवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र, परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगीचे कारण अद्यापसमजू शकले नाही. गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा असल्याने ही आग पसरत गेली असल्याचा अंदाज अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी माहिती देताना व्यक्त केला.