चांदणी चौकात होणार अग्निशामक केंद्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पौड रस्ता - पुणे शहरातील सर्वांत मोठे अग्निशामक केंद्र व प्रशिक्षण केंद्र चांदणी चौक येथे होणार आहे. स.नं. ७७ चांदणी चौक, कोथरूड येथे उभारण्यात येणाऱ्या या अग्निशामक केंद्राच्या जागेचे भूमिपूजन शनिवारी (ता. २३) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.

या केंद्रामध्ये नागरिकांनाही अग्निशामकाविषयी प्राथमिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबत नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी सांगितले, की प्रकल्पासाठी चार कोटींची निविदा काढली असून, या वर्षीसाठी दोन कोटी वीस लाख रुपयांची तरतूद स्थायी समितीमध्ये मंजूर झाली आहे. 
सुमारे दीड एकर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोथरूड स्टॅंड व एरंडवणा येथे अग्निशामक केंद्र आहे, परंतु पुण्याची वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगीकरण यांचा विचार करता मोठ्या अग्निशामक केंद्राची आवश्‍यकता होती. या छोट्या केंद्रावर येणारा ताण नवीन अत्याधुनिक केंद्राच्या उभारणीमुळे कमी होणार आहे. हे केंद्र वर्षभरात पूर्ण होणार आहे. मुळशी, खडकवासला ग्रामीण भागात व कोथरूड, बावधन, वारजे, शिवणे परिसरातील आपद्‌ग्रस्त प्रसंगात तातडीने मदत पोचवणे यामुळे शक्‍य होणार आहे.

केंद्राची वैशिष्ट्ये
पाच मोठ्या व तीन छोट्या गाड्यांसाठी पार्किंग
अत्याधुनिक सोयींसह प्रशस्त प्रशिक्षण केंद्र हॉल
व्यायाम शाळा, प्रशिक्षणार्थींसाठी निवास व्यवस्था
कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था
लहान व मोठ्या वाहनांसाठी दुरुस्ती विभाग
४, ४६,००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी
स्वतंत्र परेड मैदान

Web Title: Fire Brigade Center in Chandani Chowk