कात्रजमध्ये आग व स्फोट : अग्निशमन दलाचा जवान जखमी
आधी पैसे मग उपचार!
पैसे भरल्याशिवाय पुढील उपचार करणार नाही असे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याने खुटवड यांना घेऊन गेलेले लोक आणि रुग्णालय प्रशासन यांच्यात वाद झाला. मग नंतर पैसे भरतो, आधी उपचार करा अशी हमी दिल्यावर, तसेच तेथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सहकार्य केल्यावर जखमी खुटवड यांना दाखल करून घेतले.
पुणे : कात्रज परिसरातील टेल्को कॉलनीमधील पावडर कोटिंग कंपनीला मध्यरात्री लागलेल्या आगीत 5 गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. घटनास्थळी आग विझविण्यासाठी गेलेले अग्निशमन दलाचे जवान शिवदास खुटवड हे जखमी झाले आहेत.
आग भडकलेली असतानाच स्फोट झाल्याने एक दरवाजा उडून जवान शिवदास खुटवड यांच्या छातीला लागला. त्यांना भारती हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या शरिरात अंतर्गत रक्तस्त्राव झाला असल्याचे सांगण्यात आले. आता खुटवड यांची प्रकृती स्थिर असून धोक्यातून बाहेर आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, आधी हॉस्पिटलमध्ये पैसे भरल्याशिवाय पुढील उपचार करणार नाही असे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याने खुटवड यांना घेऊन गेलेले लोक आणि रुग्णालय प्रशासन यांच्यात वाद झाला. मग नंतर पैसे भरतो, आधी उपचार करा अशी हमी दिल्यावर, तसेच तेथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सहकार्य केल्यावर जखमी खुटवड यांना दाखल करून घेतले.