अग्निशामकने विझविली पालखी मार्गालगतची आग

संदीप घिसे 
शनिवार, 14 जुलै 2018

पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत गेलेल्या पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाने पालखी मार्गावरील काटेवाडी, बारामती येथील उसाच्या शेताला लागलेली आग विझविली. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. पालखी मार्गावरील काटेवाडी, बारामती येथील राजेंद्र निंबाळकर आणि शहाजी निंबाळकर यांच्या एक एकर उसाच्या शेतीला शॉर्ट सर्किटमुळे शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. त्यावेळी पालखी या मार्गावरून जाणार होती.

एका वारकऱ्याच्या लक्षात ही घटना आल्यावर त्याने पिंपरी अग्निशामक विभागाशी संपर्क साधून वारीसोबत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव व नंबर घेतला व आगीची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्‍यात आणली.

अग्निशामक विभागाचे जवान शंकर पाटील, रामाराम लांडगे, अवधूत आल्हाट आणि सुशीलकुमार राणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. याबाबत बोलताना अग्निशामक अधिकारी रूषीकांत चिपाडे म्हणाले, "संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोबत दरवर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाचा बंब जातो. मात्र यंदा प्रथमच या बंबाचा वापर करावा लागला. पालखीमार्गावरील रस्त्यालगत ही आग लागली होती. मात्र आग आटोक्‍यात आणल्याने वारकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही.''

Web Title: Fire brigade routes fire by firefighters