Video : पुणे : ड्रेनेजच्या खड्ड्यात गाडले गेले तिघेजण; बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

- दापोडीमध्ये सांडपाणी वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली तिघेजण अडकले

पुणे : सांडपाणी वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकलेल्या एकास वाचवण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या दोन जवानांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने ते गाडले गेले. ही घटना रविवारी दुपारी घडली असून, त्यांना बाहेर काढण्याचे काम अद्याप सुरु आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दापोडी परिसरातील विनियार्ड चर्च आहे. या चर्चच्या पाठीमागील बाजूस सांडपाणी वाहिनीसाठी एक खड्डा खोदण्यात आला आहे. तब्बल वीस फूट खोल खड्ड्यात एक नागरिक पडल्याची खबर रविवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

देवेंद्र फडणवीसच विरोधीपक्ष नेते

खड्ड्यात पडलेल्या माणसाला वर काढत असताना अचानक मातीचा ढिगारा खाली कोसळला. यामध्ये खड्ड्यात पडलेल्या माणसासह अग्निशामक दलाचे दोन जवान गाडले गेले.

जवानांसह तिघांचे प्राण वाचविण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे एक पथक लवकरच घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire Brigade try to Rescue 3 Peoples who Trapped in Drainage