
Pune IT Company Fire: विमाननगरमध्ये आयटी कंपनीला आग; अग्निशमनच्या चार गाड्या घटनास्थळी
पुणे शहराजवळील विमाननगर भागातील एका आयटी कंपनीच्या चौथ्या मजल्याला आग लागल्याचं वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचं काम सुरु आहे.
अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सॉलिटर बिझनेस हब आयटी कंपनीच्या तळमजल्यातील इलेक्ट्रिक रुममधे दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. या आगीमुळं निर्माण झालेला धूर शेवटच्या नवव्या मजल्यापर्यंत पसरला. त्यामुळं आयटी कर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली. पण अग्निशमन दलानं खबर मिळताच घटनास्थळी धाव घेतल्यानं तातडीनं आग नियंत्रणात आणण्याचं काम हाती घेण्यात आलं.
शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याचा अंदाज
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी आहे. त्यामुळं डक्टमध्ये आग पसरली आणि सर्व मजल्यांवर धुराचे लोट पसरले होते. आयटी कंपनीचे सुरक्षा रक्षक आणि अग्शिशमन दलाच्या जवानांनी आयटी कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले.