Pune Fire News : धायरीत पेंटच्या कारखान्यात आग! पाच ते सहा सिलेंडरचा झाला स्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire broke out in a paint factory at dhayari in Pune Five to six cylinders exploded

Pune Fire News : धायरीत पेंटच्या कारखान्यात आग! पाच ते सहा सिलेंडरचा झाला स्फोट

पुण्यातील धायरी भागात असलेल्या गणेश नगर गल्ली क्रमांक २२ येथे एका पेंटच्या कारखान्याला आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. संध्याकाठी ७ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीत पाच ते सहा सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान या अगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पीएमआरडीए व पुणे अग्निशमन दलाकडून ०८ वाहने दाखल झाली आहेत. या आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नाही मात्र परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार धायरीमध्ये सुरू असलेल्या विविध प्रकारच्या कारखान्यांचा फटका आज सर्वसामान्य नागरिकांच्या वसाहतीला बसला. रंग निर्मिती कारखान्याच्या आतील सिलेंडरचे आठ ते दहा वेळा स्फोट होऊन प्रचंड मोठी आग लागली.

या आगीत मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली असून अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या आठ ते दहा अग्निशामक दल बंबांनी आग शमविण्यासाठीचे काम सुरू केले आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या कारखान्याच्या परिसरात लाकडाचे व तत्सम कारखाने किंवा शेड होत्या त्यांनाही आगीचा फटका बसला.

टॅग्स :Pune News