टाकवे बुद्रुक येथील शेटे पेपर मिल कंपनीच्या कचर्‍याला आग 

रामदास वाडेकर
गुरुवार, 4 एप्रिल 2019

टाकवे बुद्रुक - येथील औद्योगिक वसाहतीतील शेटे पेपर मिल कंपनीच्या कचर्‍याला आग लागली. सुदैवाने वेळेवर आग आटोक्यात आल्याने कोणतीच जीवित व वित्त हानी झाली नाही. पन्नास टनाचा कचरा उघड्या माळरानावर पडला होता. अचानक लागलेल्या आगीचे कारण समजले नसले, तरी आग लागून उडालेल्या धुराचे साम्राज्य परिसरात  पसरले होते. 

टाकवे बुद्रुक - येथील औद्योगिक वसाहतीतील शेटे पेपर मिल कंपनीच्या कचर्‍याला आग लागली. सुदैवाने वेळेवर आग आटोक्यात आल्याने कोणतीच जीवित व वित्त हानी झाली नाही. पन्नास टनाचा कचरा उघड्या माळरानावर पडला होता. अचानक लागलेल्या आगीचे कारण समजले नसले, तरी आग लागून उडालेल्या धुराचे साम्राज्य परिसरात  पसरले होते. 

येथील औद्योगिक वसाहतीतील या पेपर मिलचा कचरा कंपनी जवळच्या मोकळ्या जागेत पडला होता, सकाळी साडे अकराच्या सुमारास आग लागली पाहता पाहता आगीचे डोंब उसळले.धूराचे लोट उसळल्यावर कान्हे टाकवे बुद्रुक रस्त्याने जाणारे अनिल मालपोटे, गुलाब गुभाले, विष्णू मालपोटे, दिपक शिंदे, बाबाजी मालपोटे, पांडुरंग असवले, नितीन कुटे यांनी या धुराचे लोट पाहून पेपर मिल कडे धाव घेतली. तेथील टाक्यातील पाणी, झाडाझुडपांच्या फांद्या घेऊन या तरुणांसह पेपर मिलच्या कामगारांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.कामगार रामकृष्ण गाडेकर यांनी पोलिसात खबर दिली. दुपारी एक वाजेपर्यंत आगीचा डोंब उसळत होता. याच सुमारास तळेगाव औद्योगिक वसाहतीतील आगीच्या बंबाने आग विझविण्यासाठी सुरूवात केली. कपिल कांबळे,प्रमोद भोयरे किरण मोरे, युवराज दाबेकर,संदीप राठोड, रामेश्वर कांगणे हे कर्मचारी आग विझविण्यासाठी राबले.वडगाव मावळचे पोलीस उपनिरीक्षक नितीन नम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सबंधित पेपर मिलने येथे टाकलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी असा आदेश वजा सुचना चार महिन्यांपूर्वी पोलीसांनी या पेपर मिल चालकाला दिली होती. 

कच्चा मालापासून पक्का माल करण्याच्या या पेपर मिल मधील कचऱ्याचा ढीग माळरानावर पसरला होता.माळरानात वाळलेले गवत पसरले होते. कच-याला लागलेली आग माळरानातील गवतामुळे अधिक भडकून वाऱ्यामुळे सर्वत्र पसरली. सुदैवाने ही आग दिवसा लागली त्यामुळे लक्षात तरी आली. औद्योगिक वसाहत पेपर मिल,रासायनिक केमिकल्स बनविणाऱ्या कंपन्या आहेत, पण सुरक्षिततेची कोणतीच साधने किंवा उपाय योजना येथे नसल्याचे आजच्या घटनेत निदर्शनास आले आहे. 

Web Title: A fire broke out at Shete Paper Mill Companys waste in Takawe Budruk