पुणे: वारजे रस्त्यावरील कपडे शिवण्याच्या कंपनीला आग

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

ओल्ड वालचंद हाऊस पीएनजी या सोन्याच्या दुकानाच्या इमारतीत ही घटना घडली. कोरिनिया हॅशटॅग या नावाची कपडे शिवण्याची फॅक्टरी आहे. चौथ्या मजल्यावर सुमारे अडीच ते तीन हजार स्केअर फूट जागेत ही कंपनी आहे. रात्रीची वेळ असल्याने कंपनी बंद होती. त्याच्या आत कोणी व्यक्ती नव्हता.

पुणे : कोथरुड स्टॅण्डपासून कर्वेनगर वारजे रस्त्यावरील ओल्ड वालचंद हाऊस इमारतीतील कपडे शिवण्याच्या कंपनीला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. तासाभरात पूर्ण आगीवर नियंत्रण मिळविले. 

ओल्ड वालचंद हाऊस पीएनजी या सोन्याच्या दुकानाच्या इमारतीत ही घटना घडली. कोरिनिया हॅशटॅग या नावाची कपडे शिवण्याची फॅक्टरी आहे. चौथ्या मजल्यावर सुमारे अडीच ते तीन हजार स्केअर फूट जागेत ही कंपनी आहे. रात्रीची वेळ असल्याने कंपनी बंद होती. त्याच्या आत कोणी व्यक्ती नव्हता. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. कंपनीचा मूळचे दरवाजा व त्याच्या शेजारील खिडकी तोडून काचा फोडून आग विझविण्यात आली. कपडे तयार झाल्यानंतर काजी बटन लावण्याच्या विभागात प्रथम आग लागली त्यानंतर ती सगळ्या कंपनीत लागली होती. येथेच त्यांचे गोडाऊन होते. 

परंत येथे कपडे ती शिवणायची मशीन यंत्र जळून खाक झाली. कोथरुड येथील अग्निशामक दलाच्या जवळ हे ठिकाण आल्याने ते वेळेत पोचले त्याने काम सुरू केले. त्यांच्या पाठोपाठ एरंडवणा येथील अग्निशमनची गाडी आली. अशी माहिती कोथरूड चे अग्निशामक दलाचे केंद्र प्रमुख गजानन पाथरूडकर व राजेश जगताप यांनी दिली. 

Web Title: fire in cotton company in Pune