पुणे : गॅसगळतीमुळे लागलेल्या आगीत आई-मुलगा भाजले

gas
gas

पुणे : शहरातील गुरुवार पेठेतील शितळादेवी चौकाजवळील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने लागलेल्या आगीत आई व मुलगा भाजल्याची घटना घडली. ही घटना सकाळी 8 वाजता घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली.

अनुपमा किशोर जोशी (वय 55) व मुलगा हिमांशु किशोर जोशी (वय 30, रा. गुरुवार पेठ) अशी या आगीत भाजलेल्याची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी शनिवारवाड्याजवळील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

गुरुवार पेठेतील शीतळादेवी चौकाजवळ अहुरा गृहनिर्माण संस्था ही सोसायटी आहे. या सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंब राहते. मंगळवारी (ता. 30) सकाळी आठ वाजता घरातील सिलिंडरमधून गॅस गळती झाली. त्यामुळे आग लागून आई व मुलगा दोघेही भाजले. दरम्यान रहिवाशांनी अग्निशामक दलाला तात्काळ खबर दिली. काही मिनीटांतच तेथे दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी लगेच आग आटोक्यात आणली. तर रहिवाशांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com