पिंपरी चिंचवडमध्ये शेती साहित्य बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

शेती पंपासाठी लागणारे साहित्य बनवणाऱ्या कंपनी रविवारी (ता. 6) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत जळून खाक झाली. ही घटना रहाटणी येथे घडली.

पिंपरी चिंचवड : शेती पंपासाठी लागणारे साहित्य बनवणाऱ्या कंपनी रविवारी (ता. 6) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत जळून खाक झाली. ही घटना रहाटणी येथे घडली.

लीडिंग फायरमन अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी चौक येथील महालक्ष्मी हाइट्स या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच रहाटणी येथील अग्निशामक बंब थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर संत तुकारामनगर पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालयातून आणखी दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचे स्वरूप लक्षात घेता प्राधिकरण निगडी आणि भोसरी येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर इमारतीच्या टेरेसवर लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलास यश मिळाले. इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे आग लागली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire at farming material company at Pimpri Chinchwad