शिरुर : घोडगंगा साखर कारखान्यात आग; बगॅस जळून नुकसान (Video)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

घोडगंगा कारखान्याचे अग्नीशमन दल सतर्क असल्यामुळें आग लवकर आटोक्यात आली. त्यानंतर रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमनदलाची गाडी मदतीला आल्यामुळे एक तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. 

न्हावरे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी, की येथील कारखान्याच्या सहविजनिर्मीती प्रकल्पाच्या शेजारी असणाऱ्या बगॅस डेपोला अचानक आग लागली असल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ऊन व वाऱ्यामुळे आगीने उग्र रुप धारण केले. त्यामध्ये सहविजनिर्मीतीसाठी बगॅस वाहून नेणारा रबरी बेल्ट पेटल्यामुळे परिसरात धुराचे लोट दिसु लागले होते.

दरम्यान घोडगंगा कारखान्याचे अग्नीशमन दल सतर्क असल्यामुळें आग लवकर आटोक्यात आली. त्यानंतर रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमनदलाची गाडी मदतीला आल्यामुळे एक तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष अँड अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता कारखान्याचा बगॅस व सहविजनिर्मीतीसाठी बगॅस वाहून नेणारा बेल्ट जळुन नुकसान झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire in Ghadganga sugar factory in Shirur