कोंढव्यातील गोडाऊनमध्ये आग; जीवितहानी नाही

Fire.jpg
Fire.jpg

पुणे : कोंढव्यातील येथील टिळेकर नगरजवळ असलेल्या  एका गोडाऊनमध्ये मंगळवारी राञी आग लागली होती. अग्निामक दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. या घडनेत कोणतीही जीवितहानी नाही झाली. 

#RighttoService आधी 'मेवा' मग 'सेवा'!

टिळेकर नगरजवळील एका गोडाऊनमध्ये नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्याबाबतची माहिती नागरिकांनी अग्निशामक नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या 2 फायरगाङ्या व  एका टँकरच्यासाह्याने जवानांनी आग अटोक्यात आणली. त्यानंतर घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू होते. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com