आख्खा संसार जळून खाक झाला अन् होत्याच नव्हत झालं

युनूस तांबोळी
मंगळवार, 17 एप्रिल 2018

टाकळी हाजी (पुणे): मध्यरात्रीला छपराच्या पाचटाने पेट घेतला अन् होत्याच नव्हत झालं, आख्खा संसार जळून खाक झाला. अंगावरच्या कपड्याने त्याचा संसार रस्त्यावर आला होता. कवठे येमाई (ता. शिरूर) हिलाळवस्तीवरील ठाकर समाजातील संजय पोपट जाधव यांचे राहते घर आगीच्या भस्मसात पडले. अशावेळी ग्रामस्थ व तेजस्वीनी फाऊडेशनच्या महिलांनी मदतीचा हात दिल्यावर पुन्हा या कुटूंबाला संसार उभे करण्याचे बळ मिळणार आहे. त्यांच्या या मदतीने मानवतेचे दर्शन घडले आहे.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावापासून तीन किलोमिटर अंतरावर घोडनदीच्या किनारी ठाकर समाजाची वस्ती आहे. येथे जाधव हे मुलगी, आई व पत्नीबरोबर वास्तव्य करून राहतात. जेवण करून हे सर्वजण अंगणात झोपले होते. रात्री दीडच्या सुमारास छपराच्या घरातील पाचटाने पेट घेतला. सुरवातीला कुठे आग लागली कळाली नाही. परंतु, आगीने अधिक पेट घेतल्यावर या कुटूंबाला जाग आली. त्यावेळी आरडाओरडा करून परीसरातील ग्रामस्थांना मदतीला बोलवले. त्यावेळी परीसरातील लोकांनी आग आटोक्यात आणली. यामध्ये या कुटूंबाचे सर्वकाही जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवीतहानी झाली नाही. या बाबत माहिती मिळताच सरपंच दीपक रत्नपारखी व ग्रामस्थांनी या कुटूंबाला मदतीचा हात दिला आहे.

शिरूर येथील तेजस्वीनी फाऊडेशनच्या महिलांना या अदिवासी कुटूंबांचे घर जळाल्याची माहिती मिळाली. त्यांनी या कुटूंबासाठी धान्य, संसारउपयोगी भांडी व कपडे मदत दिली आहे. यावेळी संस्थेच्या अदयक्ष वैशाली चव्हाण, कुमोदिनी बोऱ्हाडे, सुलताना शेख आदी महिला उपस्थीत होत्या. तातडीने महिलांनी या कुटूंबाला मदत दिल्याने आधार मिळाला आहे. या कुटूंबातील अर्चना हिला डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी या अगोदर मदत केलेली आहे.

Web Title: fire at home in kawthe yemai and social work