पिंपरीत हॉटेलला भीषण आग; दोन दुचाकीही जळाल्या 

संदीप घिसे
सोमवार, 2 एप्रिल 2018

याशिवाय येथील आवारात पार्क केलेल्या दोन दुचाकीही जळून खाक झाल्या. हॉटेलजवळ असलेल्या विद्युत रोहित्र भवती मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. शॉर्ट सर्किट मुळे येथील एक ठिणगी कचऱ्यावर पडल्याने पेट घेतला.

पिंपरी : विद्युत रोहित्राची ठिणगी पडून लागलेल्या आगीत हॉटेल व दोन दुचाकी जळून खाक झाल्या. ही घटना कामगार नगर, पिंपरी येथे सोमवारी (ता.२) पहाटे घडली. 

लिडिंग फायरमन अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार नगर पिंपरी येथील लोटस कोर्ट रेस्टोबार या हॉटेलला आग लागल्याची वर्दी पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार संत तुकाराम नगर येथील अग्निशामक मुख्यालयातून दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. तोपर्यंत हॉटेलचा तळमजला पूर्णपणे जळून खाक झाला.

याशिवाय येथील आवारात पार्क केलेल्या दोन दुचाकीही जळून खाक झाल्या. हॉटेलजवळ असलेल्या विद्युत रोहित्र भवती मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. शॉर्ट सर्किट मुळे येथील एक ठिणगी कचऱ्यावर पडल्याने पेट घेतला. पहाटेची वेळ असल्याने ही बाब कुणाच्या लक्षात आली नाही. थोड्याच वयात आगीने उग्र स्वरूप धारण केले. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Web Title: fire in hotel at Pimpri