अल्काईल अमाईन्स कपंनी बंद करण्याचा ठराव

Gramsabha
Gramsabha

कुरकुंभ (पुणे) : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड कंपनीत बुधवारी (ता. 14) रात्री लागलेल्या भीषण आग व स्फोटांमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही धोकादायक कंपनी त्वरित बंद
करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 16) गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामसभेमध्ये सर्वानुमते कंपनी बंदचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
 
कुरकुंभ ग्रामपंचायतीचे ग्रामसभा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सरपंच राहुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात अल्काईल अमाईन्स कंपनीत लागलेली आग व स्फोटांमुळे ग्रामस्थ व तरुण संतप्त झाले होते. ग्रामस्थ, महिला, वसाहतीतील कामगार आग लागल्यानंतर लहान मुलांना कडेवर घेऊन सैरभैर होऊन पळत होते. काही लोक दहा ते वीस किलोमीटर अंतरावर पळून गेले होते. अल्काईल कंपनीत अशा घटना वारंवार घडत असून ही कंपनी अत्यंत धोकादायक असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्‍यात घालून जगावे लागत आहे. त्यामुळे ही कंपनी तातडीने बंद करून धोकादायक घटना घडल्यानंतर अशा कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, भविष्यात गाव बंद ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात यावी, अशा विविध मागण्या ग्रामसभेत करण्यात आल्या.

यावेळी ग्रामसभेने विविध कर्जांना मंजुरी, विकासकामांचा आराखडा सादर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच औद्योगिक वसाहतीतील धोकादायक अल्काईल अमाईन्स कंपनी तातडीने बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते ग्रामस्थांनी मंजूर केला. ग्रामसभेला गावच्या पोलिस पाटील उपस्थित नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

याप्रसंगी उपसरपंच सूर्यकांत भागवत, आयुब शेख, विजय गिरमे, अरुण भागवत, संदीप भागवत, भानुदास सोनवणे, सुनील पवार, सनी सोनार, संजय शितोळे, राजेंद्र शितोळे, रफीक शेख, तात्या गायकवाड, नीलेश भागवत आदी ग्रामस्थ, महिला व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com