आगीतून दोघांना सुखरूप वाचविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

कोंढवा - लुल्लानगर चौकातील माणिकचंद मलबार हिल या अकरा मजली इमारतींमध्ये सहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली. मात्र, सुरक्षारक्षक विलास पाटील व साजिद अत्तार यांच्या तत्परतेमुळे फ्लॅटमधील अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्‍यात आणली.

या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून धूर येत असल्याचे एका ऑफिसबॉयने पाटील व अत्तार यांना सांगितले. ते तत्काळ आग लागलेल्या फ्लॅटजवळ पोचले. त्यांनी आग नियंत्रक (फायर एक्‍टिंगविशर) यंत्राच्या साह्याने आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यात ते अयशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी त्वरित अग्निशमन दलाला याबाबत कळविले व फ्लॅटमधील दोन जणांना घराबाहेर काढले. त्यानंतर बिल्डिंगमधील होज पाइपचा वापर करून आगीवर पाणी मारले. तोपर्यंत अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी पोचले. त्यांनी तातडीने पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. या आगीमुळे फ्लॅटचे मोठे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्‍यता अग्निशामक दलाकडून वर्तविण्यात आली आहे. कोंढवा अग्निशमन केंद्राचे तांडेल दिलीप बिबवे, चालक सचिन चव्हाण, जवान सुभाष खाडे, सागर दळवी नीलेश राजीवडे, हर्षद येवले, अनिकेत गोगावले, मनोज भारती यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.

Web Title: Fire Life Saving